मौजेदापोली/ वार्ताहर
दापोलीच्या पाऱयात पुन्हा एकदा घसरण झाल्याने दापोलीकरांना चांगलीच हुडहूडी भरली आहे. यामुळे दापोलीकरांसह बागायतदार चांगलेच सुखावले आहेत. दापोलीचा पारा 11.7 अंश सेल्सिअस असल्याची नोंद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने नोंदवली आहे. या आधी 12.7 अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली होती.
दापोलीच्या पाऱयात घसरण झाल्यामुळे थंडीत चांगलीच वाढ झाली आहे. सायंकाळी तसेच दुपारपर्यंत थंडगार वारे वहात आहेत. काही ठिकाणी आंबा बागायतींना पालवी फुटली आहे. तर काही ठिकाणी पालवीला प्रारंभ झाला आहे. थंडी देखील साथ देत असल्याने बागायतदारही समाधान व्यक्त करत आहेत.