Tarun Bharat

दापोलीत दोघा दुचाकीस्वारांवर बिबटय़ाचा हल्ला

Advertisements

साखळोली-शिवाजीनगरमधील घटना,

मौजेदापोली/ वार्ताहर

दापोली तालुक्यातील साखळोली शिवाजीनगर येथील दोघांवर बिबटय़ाने भरदिवसा हल्ला केल्यामुळे पंचक्रोशीत भीतीचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

  साखळोली शिवाजीनगर येथील वृषभ दाभोळकर (26, असोंड) व अमर लांजेकर (26, शिवाजीनगर-साखळोली) हे दोघे मोटारसायकल घेऊन चिंचमाळ मार्गावरून सोमवारी दुपारी 2.30 च्या दरम्यान प्रवास करत होते. चिंचमाळलगत रस्त्याकडेच्या झाडीमधून बिबटय़ाने अचानक मोटारसायकलवर झेप घेतली. ही झेप दाभोळकर व लांजेकर यांच्या पायावर बसली. आरडाओरडा केल्यानंतर बिबटय़ा पळून गेला. मात्र यात अमर व वृषभ जखमी झाले. त्यांच्या पायावर बिबटय़ाने पंजा मारला आहे. दोन्ही जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच दापोलीचे परिक्षेत्र वनअधिकारी वैभव बोराटे, वनपाल एस. एस. सावंत, ताडील वनरक्षक शुभांगी भिलारे, बांधतिवरे वनरक्षक गणपत जळणे यांनी रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली.

                    पॅमेराद्वारे बिबटय़ावर लक्ष ठेवणार

पिंजरा लावण्यासाठी नागपूर येथील कार्यालयाकडून परवानगी घ्यावी लागते. तत्पूर्वी बिबटय़ाची माहिती मिळवण्यासाठी कॅमेरा बसवण्यात येणार आहे. शिवाजीनगरमधील रहिवाशांनी बाहेर फिरताना काळजी घेण्याचे आवाहन गावात करण्यात आले आहे.

–  वैभव बोराटे, वनाधिकारी

Related Stories

जिल्हय़ातील 1 लाख 18 हजार कुटुंबांना नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा!

NIKHIL_N

हर्णैत 2 वर्षाच्या बाळाला कुत्र्याचा चावा

Patil_p

शिवसेनेच्या माजगांव युवासेना विभागप्रमुखपदी अतुल कासार

Ganeshprasad Gogate

जिल्हा नियोजनच्या बैठकीत लोकप्रतिनिधींची अळीमीळी गुपचिळी

Patil_p

जमिनीच्या बांधावरुन दोन भावांमध्ये हाणामारी

Ganeshprasad Gogate

कारच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

NIKHIL_N
error: Content is protected !!