अनमोड घाट पाfरसरात मध्यरात्रीपासून पडलेल्या पावसामुळे अनमोड घाटातील दूध सागर पासून खालच्या बाजूला गोवा हद्दीत सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास दरड कोसळली आहे. गोवा पोलीस अग्निशामक दल घटनास्थळी दाखल आहेत. पण पावसाचा जोर असल्यामुळे सदर दरड हटवण्यास व्यत्यय येत आहे.
सकाळी 11 वाजता दरड कोसळल्याने अनमोल घाट मार्ग बंद स्थितीत होता. ताबडतोब गोवा पोलीस वअग्निशामक दल घटनास्थळी दाखल होऊन दरड हटविली आहे.
दरम्यान, सतत पडणार्या पावसामुळे पुन्हा दरड कोसळण्याची संभावना पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.