Tarun Bharat

कुंभोजमध्ये लाखोंची धाडसी चोरी

Advertisements

कुंभोज (कोल्हापूर)

कुंभोज तालुका हातकलंगले येथे खानगोंड गल्लीत डॉक्टर अभिजीत कोरे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्याने शुक्रवारी रात्री घरी कोणी नसल्याचे पाहून अंदाजे चार लाख रुपये पेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल व रोक रकमेची चोरी केली.डॉक्टर अभिजीत कोरे यांनी बाहुबली येथे नूतन घर बांधल्याने ते बाहुबली येथे नुकतेच वास्तवास गेले आहेत. त्यांच्या जुन्या घरामध्ये वास्तवास कोण नसल्याचं पाहून रात्री बारानंतर घराचा कडीकोयंडा तोडून तीन ते चार किलो चांदीची भांडी, चांदीच्या मुर्त्या,रोख रक्कम 50 हजार रुपये ,सोन्याचे दागिने, अत्यंत महागडे घड्याळ असा ऐवज चोरट्याने लंपास केला.

अत्यंत भर वस्तीत असणाऱ्या घरामध्ये झालेल्या धाडसी चोरीने सध्या नागरिकांत चर्चेचा विषय बनला असून. डॉक्टर रात्री अकरा वाजता नूतन बाहुबलीतील घरामध्ये वस्तीसाठी गेले होते. सकाळी डॉक्टरांच्या ओपीडी साठी काही रुग्ण आले असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले. घराचा दरवाजा उघडा कसा हे विचारणा केले असता त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आले याबाबतची फिर्याद हातकलंगले पोलिसात दाखल झाली, असून भरवस्तीत झालेल्या चोरीमुळे वाडीभाग, सुतारमोहल्ला परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

पहाटे उठून भूमिका जाहीर करणार नाही! जे तुमच्या मनात ते माझ्या; खा. संभाजीराजे छत्रपती

Abhijeet Shinde

पत्रकारांना पन्नास लाखाचे विमा संरक्षण

Abhijeet Shinde

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात 2 हजार 472 कृषीपंपांना वीजजोडण्या

Abhijeet Shinde

गोकुळ पाकिस्तानात आहे काय ?

Abhijeet Shinde

कोल्हापूर : फिरस्त्याकडून फिरस्त्याचा खून

Abhijeet Shinde

कोल्हापूरात 20 नोव्हेंबरपर्यंत होणार 100% लसीकरण

Sumit Tambekar
error: Content is protected !!