तरुणभारत ऑनलाइन टीम
चेहरा कितीही आकर्षक ,सुंदर असला तरी डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळामुळे तुम्ही वयस्कर दिसू लागता. किंवा तुम्ही जास्त थकल्यासारखे दिसून येता.रोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रमाणापेक्षा अधिक तणावात राहणं,झोप पूर्ण न होणे, कंम्प्युटर, मोबाईलवर अधिक वेळ असणं, कमी पाणी पिणं,- शरीरात आर्यनची कमतरता अशा बऱ्याच कारणांमुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे दिसू लागतात. या डार्क सर्कल्सकडे वेळीच लक्ष दिलं नाही तर हे डाग कायमस्वरूपी तसेच राहतात. पण यावर काही घरगुती उपाय केल्यावर याच प्रमाण कमी होऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊयात यावर घरगुती उपाय काय आहेत.
१. दिवसभरात २ ते ३ लीटर पाणी पिण्यानेही फरक पडू शकतो. आहारात ताज्या फळांच्या रसाचा समावेश करु शकता. शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले नाही तर डोळ्यांच्या खालची त्वचा निर्जीव आणि कोरडी दिसायला लागते. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.
२. रोज रात्री नारळाच्या किंवा बदामाच्या तेलाचे काही थेंब डोळ्यांखाली लावून मसाज केल्याने फायदा होऊ शकतो.
३. बटाटे डार्क सर्कल घालवण्यात उत्तम काम करतात.कच्च्या बटाट्याचे काप किंवा बटाट्याचा रस दररोज डोळ्यांखाली लावल्याने डोळ्यांना थंडावा मिळतो.त्याचबरोबर डार्क सर्कल्सदेखील कमी होतात.
४.टोमॅटोचा रस लिंबाच्या रसाच्या काही थेंबांसोबत मिसळून लावल्याने लवकर लाभ होतो. टोमॅटो डार्क सर्कल्सना दूर करण्याचा सर्वात परिणामकारक उपाय आहे.
५. गुलाबपाणी त्वचेला स्वच्छ आणि ताजेतवाने करण्यासाठी तसेच काळी वर्तुळे काढून टाकण्यासाठी वापरू शकता. कापूस गुलाब पाण्यात भिजवून काळ्या वर्तुळांवर ठेवा. 15 मिनिटे कापूस डोळ्यांवर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने डोळे धुवा. ही प्रक्रिया सतत महिनाभर केल्यानंतर त्याचा परिणाम दिसून येईल.