तुळजाभवानी सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे वडगावात नाटय़प्रयोग सादर
प्रतिनिधी /बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडविणाऱया ‘श्रीमंतयोगी’ या महानाटय़ाचा शनिवारी प्रयोग झाला. शिवजन्मापूर्वीपासून ते राज्याभिषेकापर्यंत शिवरायांनी घडविलेला प्रत्येक पराक्रम नाटकातून दाखविण्यात आला. शिवरायांचा ज्वलंत इतिहास आजच्या पिढीलाही प्रेरणा देऊ शकतो, हे यातून दिसून आले. तुळजाभवानी सांस्कृतिक प्रति÷ानतर्फे शनिवारी वडगाव येथील आदर्श विद्यामंदिर शाळेच्या प्रांगणात ‘श्रीमंतयोगी’ या नाटकाचा प्रयोग झाला. बेळगावच्या 250 कलाकारांनी यामध्ये सहभाग घेतला होता. प्रत्यक्ष घोडे, पालखी, किल्ल्याचे देण्यात आलेले स्वरुप यामुळे एक ऐतिहासिक काळ शिवभक्तांसमोर उभा राहिला.
मोंगलांनी आक्रमण करून महाराष्ट्र भूमीची केलेली हानी, शिवछत्रपतींचा जन्म, तोरणागडाचा इतिहास, शिवरायांची रयतेसाठी असणारी आत्मियता, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखान असे विविध प्रसंग सादर करून कलाकारांनी
उपस्थित शिवभक्तांची वाहव्वा मिळविली.