Tarun Bharat

पक्षासाठी सून करतेय सासूविरोधात प्रचार

जळगाव / प्रतिनिधी :

Jalgaon Milk Union Elections जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक 10 डिसेंबरला होत आहे. या निवडणुकीत दूध संघाच्या अध्यक्षा मंदा खडसे (Manda Khadse) यांच्या विरोधात त्यांचीच सून भाजप खा. रक्षा खडसे (Raksha Khadse) प्रचारात उतरल्या आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, हा जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे.

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत 20 संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली तर भाजपा-शिंदे गटाचे गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल आहे. मुक्ताईनगर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधून दूध संघाच्या विद्यमान अध्यक्षा माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे उभ्या असून, त्यांच्या विरोधात भाजपाचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे उभे आहेत. ही लक्षवेधी लढत होत असून, या लढतीकडे जिल्हयाचे लक्ष लागले आहे. मंगेश चव्हाण यांच्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद लावली असून, प्रचारात खासदार आमदारांना उतरवले आहे.

अधिक वाचा : जळगाव दूध संघ निवडणुकीची स्थगिती उठवली; 10 डिसेंबरला मतदान

त्यामुळे केवळ पक्षासाठी रावेर मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार रक्षा खडसे या सासूच्या विरोधात म्हणजेच आ. मंगेश चव्हाण यांचा प्रचारात उतरल्या आहेत. त्यांनी चव्हाण यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतल्याने जळगावात तो चर्चेचा विषय ठरला. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत दोन्ही पॅनेलमध्ये जिल्ह्यातील मंत्री, आमदार यांच्यासारखे दिग्गज नेते उमेदवार म्हणून उतरल्याने ही निवडणूक चांगलीच गाजत आहे. आ. मंगेश चहाण यांनी खडसेंना आव्हान दिल्याने स्वत: एकनाथ खडसे हे प्रचारासाठी गावोगाव फिरत आहेत. आता सासूच्या विरोधात सूनच प्रचारात उतरल्याने या निवडणुकीत आणखी रंग भरला असून, ती राजकीय अस्तित्वाची निवडणूक ठरली आहे.

Related Stories

भोंगा एकच विषय नसून अजूनही बाहेर येतील- चंद्रकांत पाटील

Abhijeet Khandekar

इचलकरंजीतील ७० वर्षीय वृद्ध कोरोना पॉझिटिव्ह

Archana Banage

अभिनेत्री मौनी रॉय विवाहबद्ध

Abhijeet Khandekar

अतिक्रमण हटवा अन्यथा आंदोलन छेडू

Patil_p

कोल्हापूरसह `या’ जिल्ह्यात हवामान आधारित पीक विमा योजना लागू

Archana Banage

”केंद्र सरकारने पेगॅसस स्पायवेअर खरेदी केल्याची शक्यता”

Archana Banage