वृत्तसंस्था/ रोम
येथे सुरू असलेल्या युरोपियन जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेत शनिवारी पुरुषांच्या 100 मीटर फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात रुमानियाचा जलतरणपटू 17 वर्षीय डेव्हिड पोपोविसीने नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक पटकाविले.
या स्पर्धेत शनिवारी झालेल्या पुरुषांच्या 100 मीटर फ्रीस्टाईल जलतरण प्रकारात रुमानियाचा दुहेरी विश्व चॅम्पियन पोपोविसीने 46.86 सेकंदाचा अवधी नोंदवत नवा विश्वविक्रम करताना 2009 साली रोममध्ये झालेल्या विश्वजलतरण स्पर्धेत ब्राझीलचा जलतरणपटू सीझर सिलोने नोंदविलेला विश्वविक्रम 0.05 सेकंदाने मोडीत काढला. 2019 च्या विश्व चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धेत अमेरिकेचा ऑलिम्पिक चॅम्पियन जलतरणपटू कॅलेब ड्रेसेलने या क्रीडाप्रकारात 46.96 सेकंदाची सर्वात जलद वेळ नोंदविली होती. ड्रेसेलचा हा पराक्रम पोपोविसीने मागे टाकला. पुरुषांच्या 100 मीटर फ्रीस्टाईल प्रकारात हंगेरीच्या मिलाकने रौप्यपदक इटलीच्या मिरेसीने कास्यपदक मिळविले. विश्व जलतरण चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गेल्या 50 वर्षांच्या इतिहासामध्ये रोमचा पोपोविसी हा 100 आणि 200 मी. फ्रीस्टाईल प्रकारात सहभागी होणारा पहिला जलतरणपटू आहे. पोपोविसीने आपल्या वैयक्तिक जलतरण कारकीर्दीत बुचारेस्ट येथे झालेल्या युरोपियन कनिष्ठांच्या जलतरण स्पर्धेत तीन प्रकारातील विजेतीपदे मिळविली आहेत.
महिलांच्या 100 मी. फ्रीस्टाईल प्रकारात इटलीची जलतरणपटू बेनेडिटा पिलाटोने सुवर्णपदक मिळविताना 1 मिनिट 0.5.97 सकेंदाचा अवधी नोंदविला. या क्रीडा प्रकारामध्ये अमेरिकेच्या लिली किंगने 2017 साली विश्वविक्रम नोंदविला होत. इटलीच्या लिसा अँजिओलेनीने रौप्यपदक तसेच लिथुनियाच्या मेलुटेटीने कास्यपदक मिळविले. रुमानियाच्या फेड्रिको पॉगियोने पुरुषांच्या 200 मी. ब्रेस्टस्टोकमध्ये गेल्या शुकवारी सुवर्णपदक मिळविले. महिलांच्या 50 मी. बटरफ्लाय प्रकारात स्वीडनच्या सारा जोसस्ट्रॉमने 24.96 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक घेतले. या क्रीडा प्रकारात फ्रान्सच्या मारिया वॉटेलने रौप्यपदक तर हॉलंडच्या मेकी डी वॉर्डने कास्यपदक पटकाविले. पुरुषांच्या 200 मी. बॅकस्ट्रोकमध्ये फ्रान्सच्या योहानेन ब्रोरार्दने सुवर्णपदक घेतले. हंगेरीच्या कोव्हॅक्सने रौप्य तर इंग्लंडच्या ग्रीन बँकने कास्यपदक मिळविले.