Tarun Bharat

दाऊदच्या हस्तकाची नेपाळमध्ये हत्या

Advertisements

भारतात बनावट नोटा फैलावणारा मुख्य सूत्रधार : आयएसआयच्या कारवायांमध्ये होता सामील

वृत्तसंस्था / काठमांडू

नेपाळच्या काठमांडूमध्ये 19 सप्टेंबर रोजी एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी गुप्तचर यंत्रणेने मोठा खुलासा केला आहे. मारला गेलेला व्यक्ती पाकिस्तानी आयएसआय एजंट होता. दाऊद इब्राहिमच्या टोळीकरता तो भारतात बनावट नोटा पोहोचवित होता असे समोर आले आहे. या व्यक्तीची हत्या कुणी आणि कशासाठी केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हा व्यक्ती उद्योजक म्हणून नेपाळमध्ये ओळखला जात होता. 55 वर्षीय लाल मोहम्मद असे त्याचे नाव असून तो आयएसआयचा हस्तक होता. पाकिस्तान आणि बांगलादेशातून नेपाळ अन् भारतात बनावट भारतीय नोटा पोहोचविण्याचे काम तो करत होता. नेपाळमध्ये येणाऱया आयएसआयच्या अन्य हस्तकांना आश्रय देण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. याचबरोबर तो दाऊद इब्राहिमच्या टोळीच्या संपर्कात होता.

नेपाळमध्ये राहणाऱया आयएसआय हस्तक लाल मोहम्मदवर 2 अज्ञात बाइकस्वारांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. दोन्ही हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. त्याच्या हत्येची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

लाल मोहम्मदवर यापूर्वीही हल्ला करण्यात आला होता. 19 सप्टेंबरपूर्वी त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला होता. आयएसआय हस्तकाने काठमांडू पोलिसांकडून सुरक्षा मागितली होती. लाल मोहम्मद एक कॉन्ट्रक्ट किलर होता, जुलै 2007 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. काठमांडूत बनावट नोटा तयार करणाऱया एका इसमाची त्याने हत्या केली होती. याप्रकरणी डी गँगचा शार्प शूटर मुन्ना खानलाही अटक करण्यात आली होती. स्थानिक न्यायालयाने दोघांना 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. भारतीय आणि बांगलादेशात बनावट नोटा फैलावण्याचे काम तो आयएसआयच्या इशाऱयावर करत होता. याकरता त्याने पूर्ण रॅकेट तयार केले होते.

Related Stories

कोरोनामुळे मृत्यू होण्यास अन्य आजार जबाबदार – संशोधकांचा दावा

Patil_p

मॉडर्नाची लस मुलांवर 100 टक्के प्रभावी

Patil_p

मोबाईलवरून नजर हटू नये म्हणून…

Patil_p

पतीच्या पूर्वाश्रमीला पत्नीला किडनी दान

Patil_p

भारताचे यश जगाला प्रेरणा देईलभारताचे यश जगाला प्रेरणा देईल

Patil_p

भारतासाठी धोक्याची घंटा; तिबेटजवळील रेल्वेमार्गाचे काम पूर्ण

datta jadhav
error: Content is protected !!