Tarun Bharat

डीसी कार्यालय वाहतूक कोंडीच्या कचाट्यात

रस्ता कामांमुळे समस्या, काम संथगतीने सुरू असल्याने नाराजी, रस्ताकाम त्वरित पूर्ण करण्याची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

जिल्हाधिकारी कार्यालय सध्या वाहतूक कोंडीच्या कचाट्यात अडकत आहे. येथील रस्ताकामांमुळे मोठी समस्या निर्माण झाली असून ही कामे संथगतीने सुरू असल्यामुळे नागरिकांना व वाहतूकदारांना याचा मोठा फटका बसत आहे. परिणामी या कामांना गती देवून येथील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जिल्हा पंचायतकडे जाणारा रस्ता याचबराब्sार वाचनालयाकडून येणारा रस्ता खोदाई करून ठेवण्यात आला आहे. परिणामी याचा फटका येथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना बसत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करत या रस्त्याच्या कामासाठी कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात सुरू असलेल्या कामामुळे या परिसरातील रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना फेरा माऊन जावे लागत आहे. तर काही जणांना वाहने इतर ठिकाणी पार्किंग करून कार्यालयाकडे धाव घ्यावी लागत आहे. तसेच कित्तूर चन्नम्मा चौकाकडून फिऊन व इतर ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात रस्ता तसेच नवीन इमारती उभे करण्यासाठी काम सुरू झाले आहे. जेसीबीच्या सहाय्याने रस्ता तसेच खुल्या जागेमध्ये खोदाई करण्यात येत आहे. मात्र हे काम अत्यंत संथगतीने करण्यात येत असल्याने याचा फटका नागरिकांना बसत आहे. मागील काही दिवसांपासून या कामाला गती देण्यात आली नव्हती. मात्र शनिवारी हे काम सुरू करण्यात आले.

मातीचे ढीगही रस्त्याच्या शेजारी पडले असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. नागमोडी असलेला रस्ता हा सरळ केला जाणार आहे. त्यामुळे रस्त्याला लागूनच मोठी चर मारण्यात आली असल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. कामाला सुऊवात झाली तरी हे काम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्मयता आहे. तेंव्हा प्रथम रस्ता पूर्ण करावा आणि त्यानंतर इतर कामे करावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, वाचनालयाच्या बाजुनेही रस्ता कामाला चालना देण्यात आली असली तरी मागील 8 ते 10 दिवसांपासून हे काम सुरू आहे. मात्र अजूनही त्या रस्ता करण्यासाठी म्हणावी तशी गडबड करण्यात येत नाही. याचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यामुळे आता रहदारी कित्तूर चन्नम्मा चौकाकडे वाढली आहे. त्या ठिकाणी आता सिग्नलसमोरच वाहनांची गर्दी होताना दिसत आहे. तेंव्हा तातडीने हे काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

Related Stories

मध्यरात्री शेतवडीत ट्रक क्लिनरचा खून

Patil_p

झेवर गॅलरी डायमंड संघाची विजयी सलामी

Amit Kulkarni

फसवणूक प्रकरणी माहिती देण्याचे आवाहन

Omkar B

पोलीस भरती परीक्षेत बोगस परीक्षार्थी

Omkar B

अनगोळ येथे बलिदान मासची सांगता

Amit Kulkarni

पुनीतच्या नेत्रदानामुळे कर्नाटकात नेत्रचळवळ उभी

Archana Banage