Tarun Bharat

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील 5 जणांना कोरोना; BCCI कडून वेळापत्रात बदल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यातील 5 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या सामन्यावर अनिश्चिततेचे सावट होते. बीसीसीआयने बुधवारी होणाऱ्या पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटलच्या सामन्याचे ठिकाण बदलले आहे. पुण्यातील MCA स्टेडियमवर होणारा हा सामना मुंबईच्या बेब्रॉन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

दिल्ली कॅपिटल्सचा फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट याचा 15 एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर स्पोर्ट्स मसाज थेरपिस्ट चेतन कुमार, टीम डॉक्टर अभिजीत साळवी, खेळाडू मिचेल मार्श आणि सोशल मीडिया कंटेन्ट टीम सदस्य आकाश माने यांनाही कोरोनाची लागण झाली. या सर्वांना हॉटेलमधील खोलीत विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, दिल्लीचा हा संघ सध्या मुंबईत असून, सामन्यासाठी सोमवारीच पुण्याला रवाना होणार होता. मात्र, कोरोना शिरकावामुळे बुधवारचा सामना मुंबईच्या बेब्रॉन स्टेडियमवर होणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

Related Stories

महाराष्ट्रात 9 ऑक्टोबरपासून धावणार ‘या’ पाच एक्सप्रेस गाड्या

Tousif Mujawar

नागालँड, मणिपूर, चंदीगड उपांत्य फेरीत

Patil_p

लहान मुलांच्या वेठबिगारीवरुन राज ठाकरे आक्रमक ; ट्विट करत म्हणाले, महाराष्ट्राला शोभणारं नाही…

Archana Banage

लोकशाहीच्या जपणुकीसाठी कटिबद्ध राहुया!

Patil_p

रुग्णाला स्पर्श न करता वैद्यकीय तपासणी करणे अवघड

Patil_p

देशात आणखी 18 हजार बाधित

datta jadhav