इंडोनेशियातील अत्यंत अजब प्रथा
जगात असे अनेक समुदाय आहेत, ज्याबद्दल लोक अद्याप अनभिज्ञ आहेत. हे समुदाय जुन्या काळातील प्रथापरंपरांचे पालन करत आले आहेत. काही देशांमध्ये आजही पूर्वजांकडून लागू करण्यात आलेल्या परंपरेनुसरा लोक जगत असतात. इंडोनेशियातही असेच दिसून येते. तेथील एका समुमदायात कुटुंबाच्या सदस्याचा मृत्यू झाल्यास मृतदेह दफन केला जात नाही.
इंडोनेशियातील या समुदायात एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत नाहीत. तर मृतदेह स्वतःसोबत ठेवला जातो. तोरोजन समुदायाचे लोक मृत्यूलाही स्वतःच्या जीवनाचा एक हिस्सा मानतात. एवढेच नव्हे तर परिवारातील मृत सदस्यासोबत जगतात.


इंडोनेशियाच्या सुलावेसी पर्वतीय भागात राहणाऱया तोराजन समुदायाचे लोक मृत सदस्यांसोबत तो आजारी असल्याप्रमाणे वागतात. पारंपरिक स्वरुपात या समुदायाच sलोक मृत सदस्याला दररोज दुपारच्या जेवणासाठी आमंत्रित करतात. जोपर्यंत मृतदेह दफन केला जात नाही तोवर हे केले जाते. परिवार स्वतःच्या मृत सदस्याच्या मृतदेहाला अनेक वर्षांपर्यंत स्वतःच्या घरात ठेवत असतात.
दरदिनी मृताला अन्न भरविणे आणि मृतदेहला घरातील एका वेगळय़ा खोलीत बेडवर ठेवयणची सुलावेसीच्या तोराजन समुदायात प्रथा आहे. परिवार मृत सदस्यावर योग्य अंत्यसंस्कार करत नाही तोवर याचे पालन केले जाते. परंतु अंत्यसंस्काराची वेळ आल्यावर मृतदेह दफन केला जातो. दफन केल्यावरही मृतदेहाची नियमित देखभाल केली जाते आणि साफ-सफाईची काळजी घेतली जाते. मेनने (पूर्वजांची देखभाल) नावाच्या एका पंरपरेनुसरा नवे कपडे दिले जातात. तोराजन परंपरेत शवपेटीत भेटवस्तू ठेवण्याची प्रथा आहे. मृताच्या मनपसंत गोष्टी म्हणजेच मोबाइल, पर्स, बांगडय़ा अणि घडय़ाळ इत्यादींचा यात समावेश असतो. तर काही लोक स्वतःच्या मृत सदस्यांच्या शवपेटीत हिराही गाडून ठेवू शकतात. परंतु अनेकदा यामुळे चोरीचे प्रकार घडतात. याचमुळे तोराजन मृतांसाब्sात ठेवल्या