तरुण भारत

फोंडय़ात मलनिस्सारणच्या चेंबरात बुडून एका कामगाराचा मृत्यू ; एक गंभीर

कपिलेश्वरी अंडरपास जंन्क्शन येथील घटना : कामगाराच्या सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर

प्रतिनिधी / फोंडा

Advertisements

कपिलेश्वरी फेंडा येथील अंडरपास जन्क्शनजवळील मलनिस्सारण चेंबरमध्ये पाणी उपसण्याचे काम करणाऱया एका कामगाराचा आठ मिटर खोल चेंबरात गुदमरल्यानंतर  पाण्य़ात बुडून मृत्यू झाला. तसेच त्याचा साथी कामगार गंभीर जखमी झाला आहे. शुभम गोपडे (21, मूळ महाराष्ट्र) असे मृताचे नाव असून शहाबुद्दिन (18, प.बंगाल) हा गंभीर जखमी झालेला आहे. सदर घटना काल गुरूवारी सायंकाळी 6 वा. सुमारास उघडकीस आली.

  फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कपिलेश्वरी ढवळी बायपास येथील  अंडरपास जन्क्शनजवळील (कुपनलिकासारखा अरूंद चेंबर) मुख्य मलनिस्सारणाच्या चेंबरमध्ये पाणी साचल्याने ते पंप लावून काढण्याचे काम मागील चार पाच दिवसापासून सुरू होते. पंपच्या पाईप व बादल्यातून पाणी उपसण्यासाठी फक्त दोघे कामागार कार्यरत होते. यावेळी त्य़ाना कोणतेही सुरक्षेचे साहित्य त्याना पुरविण्यात आलेले नव्हते. अचानक पंपात बिघाड झाल्याने तो बंद पडला, यावेळी सर्व जोडणी असलेल्या चेंबरचे पाण्य़ाचा रिव्हर्स फ्लो होऊन पाण्य़ाची पातळी वाढली. यावेळी गोंधळलेला कामगार पाण्यात ओढला गेला. आठ मिटर खोल व एक मिटर रूंदीचा चेंबरमध्ये गुदमरला व पाण्यात बुडाला. साथी कामगार त्याला पाण्यातून बाहेर काढताना जखमी झाला. फोंडा येथील उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी शुभम याला मृत घोषित केले. मृत शुभम याला चेंबरातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचा प्रयत्न करणाऱया शहाबुद्दिन हा उपजिल्हा ईस्पिळात उपचार घेत आहे. याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकाच्या महिला उपनिरीक्षक रश्मी भाईडकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात येणार आहे.

     मलनिस्सारण प्रकल्पाच्या सुरक्षेअभावी कामगाराचा मृत्यू    मागील सात वर्षापासून फोंडय़ात मलनिस्सारण प्रकल्पाच्या चेंबर, वाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना रस्त्याच्या मधोमध खड्डे खोदण्याचे काम सुरू असते, यावेळी देखरेखेसाठी संबंधित कामाचा कंत्राटदारही दिसत नसून खात्याचे अभियंतेही आढळत नाही. या कामगारांचे काम रामभरोसे सुरू असते. मलनिस्सारण चेंबरमुळे फोंडयात अनेक अपघाताच्या घटनामुळे जीव गमावलेले आहेत. तरीही संबंधित खाते सुरक्षेचे उपाययोजना धाब्यावर बसवून निवांत काम करत असते. कामगाराचा मृत्यू ही घटनास्थळावर नसलेल्या सुरक्षिततेच्या निष्काळजीपणे घडल्याचे येथील ग्रामस्थाचे म्हणणे आहे. सदर घटनेची कोणालाही सुगावा लागू न देण्याची व्यवस्थित आखणी कंत्राटदार व पोलिसांनी केली होती. नाक्यावरील चेंबरमध्ये एक कामगार बुडून मृत झाल्याची बातमी गावभर पसरल्यानंतर सुरक्षेच्या साहित्याचीही मांडणी घटनास्थळावर करून ठेवल्याचे चित्र दिसत होते.

Related Stories

कायद्याचे पालन करणे सर्वांचे कर्तव्य : कामत

tarunbharat

काँग्रेस महिला मोर्चाचा मुख्यमंत्री निवासावर मोर्चा

Omkar B

गॅसवाहिनीसाठी फातोर्डातील रस्ते खोदण्यास परवानगी देऊ नये

Patil_p

काकुमड्डी येथील अपघातात कुडचडेच्या युवकाचा मृत्यू

Omkar B

सिद्धेश नाईक यांच्यावर ‘कोवॅक्सिन’ चाचणी

Patil_p

गोवा – दिल्लीचे वीजमंत्री 26 रोजी आमने-सामने

Amit Kulkarni
error: Content is protected !!