Death of a youth from Ottawane
ओटवणे डॉ बाबासाहेब आंबेडकरनगर येथील विजय उत्तम जाधव (३८) या युवकाचे रविवारी पहाटे गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. पॅरालेसीसचा आजार असलेला विजयवर ब्रेन हॅमरेजमुळे गेले आठ दिवस गोवा बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू होते. शस्त्रक्रियाही करूनही प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे अखेर त्याचे रविवारी पहाटे निधन झाले. विजय गोव्यात मंडप डेकोरेटर्सच्या कामाला होता. त्याच्या निधनाचे वृत्त सकाळीच समजताच ओटवणे गावावर शोककळा पसरली. त्यांच्या आकस्मित व अकाली निधनाने जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगरच कोसळला असुन शांत आणि मन मिळावू विजयच्या आकस्मित निधनाचा सर्वांनाच धक्का बसला. येथील उत्तम जाधव यांचा तो मुलगा तर सूर्यकांत जाधव यांचा तो चुलत भाऊ होत. त्याच्या पश्चात पत्नी, लहान एक मुलगा व मुलगी, आई, वडील, दोन बहिणी, चुलत भाऊ असा परिवार आहे.
ओटवणे / प्रतिनिधी