Tarun Bharat

अपघातात भाऊ-बहिणीचा मृत्यू

घटप्रभा : मुडलगी तालुक्यातील मुधोळ-निपाणी राज्य मार्गावरील गुर्लापूर गावाजवळ झालेल्या कार अपघातात भाऊ-बहिणीचा मृत्यू झाला. गुऊवारी ही घटना घडली. दुंडाप्पा अडिवेप्पा बडिगेर (वय 32) व भाग्यश्री कंबार (वय 28) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी, दुंडाप्पा बडिगेर हे बहिणीसोबत धारवाडहून कारद्वारे गावाकडे येत होते. समोरून येणाऱ्या वाहनाला धडक बसेल या भीतीने त्यांनी आपली कार शेताकडील रस्त्याकडे वळविली. यावेळी कार उलटल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच मुडलगी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या अपघाताची नोंद मुडलगी पोलीस स्थानकात झाली असून पुढील तपास सुरू आहे. दुंडाप्पा बडिगेर हे कप्पलगुद्दी गावातील तालुका पंचायत अभियंता म्हणून कार्य करीत होते.

Related Stories

जोरदार वाऱयासह पावसाने झोडपले

Amit Kulkarni

बेळगावकरांना लाभले नाही अंतिम दर्शन

Patil_p

कारवार मार्गावर बोलेरो अपघातात चालक जखमी

Patil_p

वॉर्ड पुनर्रचना-आरक्षण सुनावणी दोन आठवडे लांबणीवर

Amit Kulkarni

पाऊस ओसरला तरीही धास्ती कायम

Patil_p

बेळगाव महापौर, उपमहापौरपदाचे आरक्षण जाहीर

Sandeep Gawade