ओटवणे /प्रतिनिधी-
मळगाव येथील प्रसिध्द माळीच्या घराचे कुटुंबप्रमुख तथा सोनुर्ली – मळगाव या दोन गावच्या देवस्थानचे मानकरी मोतीराम आत्माराम राऊळ (९०) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. वारकरी संप्रदायातील मोतीराम राऊळ यांचे धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच सामाजिक क्षेत्रात काम करताना गावचे उपसरपंचपदही भूषविले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत राऊळ कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, एक मुलगी, एक भाऊ, सुना, भावजय, पुतणे नातवंडे जावई असा परिवार आहे. येथील शामसुंदर आणि चंद्रकांत राऊळ यांचे ते वडील होत तर मळगावचे माजी उपसरपंच दत्ताराम राऊळ यांचे ते काका तसेच माजी उपसरपंच सौ अक्षया आणि सौ देवयानी राऊळ यांचे ते चुलत सासरे होत.Attachments area