Tarun Bharat

योगी आदित्यनाथांना जीवे मारण्याची धमकी

Advertisements

लखनौ

 उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लखनौच्या आलमबाग भागात राहणारे देवेंद्र तिवारी यांच्या निवासस्थानी एका बॅगेत देवेंद्र तिवारी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारे पत्र सापडले आहे. देवेंद्र तिवारी यांनी अवैध कत्तलखाने बंद करण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. ही याचिका दाखल केल्यापासून काही समाजघटकांमध्ये त्यांच्याविरोधात संताप पसरला आहे.

देवेंद्र तिवारी यांच्या घरी मिळालेल्या पत्रात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘काही जणांचा गळा कापलाय, आता तुम्हा दोघांना बॉम्बने उडवून टाकू’ असा मजकूर पत्रात नमूद करण्यात आला आहे. धमकी देणाऱया व्यक्तीने आपले नाव शाहिद असे नोंदवले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे. यापूर्वीही योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याच्या धमक्मया आल्या होत्या.

Related Stories

“आम्ही पळत नव्हतो, इशारा न देताच सर्व बाजूंनी गोळीबार…”; पीडित व्यक्तीने अमित शाहांचा दावा फेटाळला

Abhijeet Shinde

दिल्लीत मागील 24 तासात 4,525 नवीन कोरोना रुग्ण; 340 मृत्यू

Rohan_P

पुन्हा महागाईचा चटका

Patil_p

मध्यप्रदेशातील काँग्रेस सरकार संकटात

tarunbharat

उत्तराखंडात कोरोना : 1333 नवे रुग्ण; 8 मृत्यू

Rohan_P

लवकरच वीज दरवाढीचा शॉक

Patil_p
error: Content is protected !!