Tarun Bharat

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

कुर्ला इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर पोहचला आहे. तर 12 जण जखमी असून, त्यामधील चार जणांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुर्ल्याच्या नेहरूनगर परिसरातील नाईकनगर सोसायटी नावाची चार मजली इमारत मध्यरात्री कोसळली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर अग्निशमन दल आणि एनडीआरएफची तुकडी दाखल झाली होती. रात्रीपासून बचावकार्य सूरू आहे. ढिगाऱ्याखाली 20 ते 25 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामधील 12 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

घटनास्थळी स्थानिक पोलीस, महापालिकेचे अधिकारी, एनडीआरएफचं पथक आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित आहेत. ढिगारा हटवून त्याखाली आणखी कोणी अडकले आहे, का याचा शोध बचावपथकाकडून सुरू आहे.

Related Stories

साताऱयात दुकानदाराचा निघृण खून

Patil_p

एमपीएससी परीक्षेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

Abhijeet Shinde

चितळीत कोरोनाचा आकडा 23 वर

Patil_p

पुढील पाच दिवस महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवरील मच्छीमारांना सर्तकतेचा इशारा

Abhijeet Khandekar

कुणी बेड देता का बेड!

Patil_p

फोन टॅपिंगसाठी रश्मी शुक्लांनी मुख्यमंत्र्यांची परवानगी घेतली होती का?; नवाब मलिकांचा सवाल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!