Tarun Bharat

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत अभ्यासाअंतीच निर्णय

Advertisements

पुणे / प्रतिनिधी :

Decision on sale of wine in super market only after study राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत शासन स्तरावर अभ्यासाअंतीच निर्णय घेण्यात येईल. याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिले आहे.

पुणे जिल्हय़ाच्या दौऱयावर असताना पत्रकार परिषदेत काही माध्यम प्रतिनिधींनी सुपर मार्केटमधील वाईन विक्री धोरणाबाबत प्रश्न विचारला होता. त्यानंतर राज्य सरकार सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या बाजूने असल्याच्या बातम्या आल्या. यावर स्पष्टीकरण देताना देसाई म्हणाले, वाईन विक्रीबाबत मागील सरकारच्या काळात घेतलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने सविस्तर निवेदन केले होते. यामध्ये सदर निर्णयांच्या अनुषंगाने हा प्रस्ताव राज्यातील जनतेच्या सूचना तसेच प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जनतेसमोर ठेवला आहे.

अधिक वाचा : गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही

प्रस्तावावर मुख्यमंत्री महोदय तसेच उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशा चर्चा करून पूर्ण अभ्यासाअंती मंत्रिमंडळ याबाबतचा निर्णय घेईल, असे निवेदन केले होते. मात्र काही माध्यमांनी याबाबत बोलण्याचा विपर्यास करून वृत्त दिले आहे. राज्य शासन सुपर मार्केटमधील वाईन धोरणांच्या बाजूने असे संकेत असल्याचे काही वृत्तात नमूद करण्यात आले आहे. असा कोणताही निर्णय झालेला नसून, निवेदनात सांगितल्याप्रमाणे शासन सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबत पूर्ण अभ्यासाअंती निर्णय घेईल, असे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

Related Stories

कागल तालुक्यातील मौजे सांगाव येथील युवक पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

वनसमितीच्या पैशावर कासाणीतील टग्यांचा डोळा

Patil_p

साेलापूर : माढा तालुक्यात सात कोरोनाबाधितांची भर

Abhijeet Shinde

भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; देवेंद्र फडणवीस आक्रमक

Abhijeet Shinde

धामणगाव : 350 वर्षांत पहिल्यांदाच आषाढी यात्रेला ब्रेक

Abhijeet Shinde

सातारा पालिकेत पुन्हा अभिजीत बापट?

Patil_p
error: Content is protected !!