वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील मद्य धोरणातील अनियमिततेशी संबंधित प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर राऊस अॅव्हेन्यू न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. विशेष न्यायाधीश एम. के. नागपाल 31 मार्च रोजी सिसोदिया यांच्या जामिनावर आदेश सुनावतील.
दिल्ली न्यायालयाने मद्य धोरण प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मनीष सिसोदिया यांना 5 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी दिलेली आहे. सध्या मद्य धोरण प्रकरणाचा तपास सीबीआय आणि ईडी या दोन्ही तपास यंत्रणांकडून सुरू आहे. ईडीने 9 मार्च रोजी तिहार तुऊंगातून सिसोदिया यांचा ताबा घेतला होता. त्यानंतरही 17 ते 22 मार्चपर्यंत ते ईडी रिमांडवर आहेत. आता 23 मार्चपासून त्यांचा ताबा सीबीआयकडे गेला आहे.