Tarun Bharat

गुंजी माउलीचा यात्रोत्सव शांततेने साजरा करण्याचा निर्णय

Advertisements

वार्ताहर /गुंजी

येथील माउली देवी मंदिरासमोरील सांस्कृतिक भवनात घेण्यात आलेल्या शांतता बैठकीत गुंजी माउली देवी यात्रोत्सव शांततेने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका न्यायदंडाधिकारी व खानापूरचे तहसीलदार प्रवीण जैन होते.

उपस्थितांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरवषी येथील माउली देवीचा यात्रोत्सव विजयादशमीपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. मात्र मागील दोन वर्षे कोरोनामुळे मोठय़ा प्रमाणात यात्रोत्सव साजरा करता आला नाही. यावषी हा यात्रोत्सव मोठय़ा उत्साहाने व शांततेने साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त सर्व शासकीय अधिकाऱयांच्या उपस्थितीत यात्रोत्सव साजरा करण्यासाठी विचारविनिमय करून रूपरेषा ठरविण्यात आली. तसेच अधिकारी वर्गाने येथील उत्सव कमिटी, पंच, पुजारी व घाडी बंधू यांच्याशी चर्चा करून यात्रोत्सव साजरा करण्यासाठी मार्गदर्शन केले.

यावेळी पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंगे, बस डेपोचे अधिकारी, हेस्कॉम अधिकारी, आरोग्य अधिकारी, गुंजी ग्राम पंचायत अध्यक्षा, पीडीओ व सदस्य तसेच उत्सव कमिटीचे अध्यक्ष राजाराम देसाई, खेमान्ना घाडी, दीपक देसाई, महेश कोडोळी, दिनेश कुलकर्णी यासह पंच कमिटी, पुजारी, घाडी बंधू व गावकरी उपस्थित होते.

Related Stories

अखेर अनगोळ रस्त्यावरील जलवाहिनीची दुरुस्ती

Amit Kulkarni

पश्चिम भागातील रस्ते हरवले खड्डय़ांत

Amit Kulkarni

चन्नम्मा नगर येथील पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन

Amit Kulkarni

डॉ. दिनकर साळुंखे यांची शिक्षण संस्थांना भेट

Omkar B

‘बेस्ट बी स्कूल्स ऑफ इंडिया’च्या क्रमवारीत जीआयटी

Omkar B

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर

Amit Kulkarni
error: Content is protected !!