आमदार विजय सरदेसाईंची मागणी ;l विधानसभा कामकाज वाढवावे
पणजी : रामनवमीला मर्यादित सुट्टी कशाला? संपूर्ण देशात सार्वजनिक सुट्टी आहे. गोव्यातही सार्वजनिक सुट्टी जाहीर कऊन गोव्यातील भाजप नेत्यांनी आपण नकली रामभक्त नसून खरे रामभक्त आहोत हे दाखवून द्यावे, अशी जोरदार मल्लिनाथी गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी केली आणि अधिवेशनाचा एक दिवस वाढवून न देता तो कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. विजय सरदेसाई यांनी एक व्हिडियो जारी केला आणि भाजप सरकारवर जोरदार तोंडसुख घेतले. रामनवमीनिमित्त सुट्टी देणार असा आपल्याला अंदाज होता, त्यामुळे गुऊवारी आपण म्हटले होते की, पाच दिवसांऐवजी चार दिवस अधिवेशन घेतले जाऊ नये. एप्रिलच्या 3 तारखेला एक दिवस वाढवून द्या, अशी मागणी आपण केली होती. परंतु, या सरकारने विरोधी पक्षाची आणि जनतेचीही फसवणूक केली आहे.
खरे श्रीराभक्त असाल तर …
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे खरे रामभक्त नाहीत. अधिवेशन काळात श्रीरामनवमी आहे हे त्यांना माहीत नव्हते काय? आणि संपूर्ण देशभरात श्रीरामनवमीची सार्वजनिक सुट्टी असताना गोव्यातच मर्यादित सुट्टी कशाला? खरे रामभक्त असाल तर गोव्यातही श्रीरामनवमीची सार्वजनिक सुट्टी जाहीर करा. 24 मर्यादित सुट्ट्या आहेत त्या 23 कराव्यात. 17 सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्या 18 करा, असेही ते म्हणाले. गोवा सरकारचा हा प्रकार म्हणजे ‘मुँह मे राम और बगल मे छुरी’ असा आहे. अलिकडे मुख्यमंत्री चार्टर विमानाने फिरत असतात. त्यांना गोव्यातील वस्तुस्थिती माहित नाही, अशी टीका कऊन विजय सरदेसाई यांनी यापूर्वी दिगंबर कामत सरकारने देखील रामनवमीनिमित्त अधिवेशन रद्द केले होते याची आठवण कऊन दिली. सुट्टीस आक्षेप नाही परंतु अधिवेशनचा एक दिवस 3 एप्रिल रोजी कामकाज ठेवून भऊन काढावा, या मागणीचा त्यांनी पुनऊच्चार केला.