विविध खाद्यतेलांचा समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशी बाजारातील नरमाईमुळे दिल्लीच्या बाजारात जवळपास सर्व तेल आणि तेलबियांच्या किमती घसरल्याचे वृत्त आहे. सूत्रांनी सांगितले की, मलेशिया एक्सचेंजमध्ये 5.25 टक्क्यांची मोठी घसरण झाली. त्याचवेळी, शिकागो एक्सचेंज देखील एक टक्क्याने घसरला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विदेशी बाजारातील मंदीचा स्थानिक तेल आणि तेलबियांच्या बाजारावरही परिणाम झाला आहे. त्याचवेळी, सोयाबीन, सीपीओ, पामोलिन आणि सूर्यफूल या आयातीत तेलांच्या किमती जवळपास निम्म्याने कमी झाल्या आहेत. दुसरीकडे सोयाबीनच्या नवीन पिकाचीही तुरळक आवक सुरू झाली असून, त्याचा परिणाम किमतीवर झाला आहे.
भुईमूग हे घरगुती पीक आहे जे काही काळासाठी तयार होते, त्यामुळे त्याचा व्यवसाय मंदावतो. बाजारातील सूत्रांनी सांगितले की, तेल-तेलबियांच्या किमतीत मोठी घसरण होऊनही तेल कंपन्यांचे एमआरपी (कमाल किरकोळ मूल्य) उच्च राहिले. ते म्हणाले, की पाम तेलाचे दर चार महिन्यांपूर्वी सुमारे 2,100 डॉलर प्रति टन वरून 950 डॉलरपर्यंत घसरले आहेत.
तेलाबाबत सरकारने सतर्क राहण्याचे आवाहन
पूजा तेलाच्या नावाखाली काही रसायनांचाही वापर केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. यामध्ये एफएसएसएआय (फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया)कडून मंजुरी घेतली जात नसल्याची बाब समोर येते आहे. यामुळे गैरवापर होतो आहे.