फेब्रुवारीमधील 6.44 टक्क्मयांवरून 5.66 टक्क्मयांपर्यंत घसरण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
किरकोळ महागाई दरात सलग दुसऱ्या महिन्यात घट झाली आहे. फेब्रुवारीमध्ये 6.44 टक्क्यांवर असलेला हा दर मार्च 2023 मध्ये 5.66 टक्के झाला आहे. जानेवारी 2023 मध्ये किरकोळ चलनवाढीचा दर 6.52 टक्के होता. मागील तीन महिन्यांमध्ये या महागाई दरात घसरण होत असल्याने सर्वसामान्यांना किंचित दिलासा मिळालेला आहे.
बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या किरकोळ महागाई दराच्या अहवालानुसार, मार्च महिन्यात खाद्यपदार्थांच्या महागाई दरातही घट झाली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये 5.95 टक्क्यांवर असलेला अन्नधान्य महागाई दर मार्चमध्ये 4.79 टक्क्मयांवर आला आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या महागाई दरात किंचित घट झाली आहे. दुधाची महागाई फेब्रुवारीमध्ये 9.65 टक्क्मयांवरून मार्चमध्ये 9.31 टक्क्मयांवर आली आहे. परंतु मसाल्यांच्या महागाईचा दर 18.21 टक्के, डाळी 4.33 टक्के, फळे 7.55 टक्के अशी नोंद दिसून आली आहे. तसेच भाज्यांचा महागाई दर -8.51 टक्के, मांस आणि मासे -1.42 टक्के, तेल -7.86 टक्के यांच्यात मोठी घट झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला.