Tarun Bharat

शिवसेनेचे राज्यपालांना पत्र म्हणजे रडीचा डाव; दीपक केसरकरांचा हल्लाबोल

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिंदे गट आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे खेळ सुरूच आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी आज पुन्हा शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना पत्र लिहिणं म्हणजे रडीचा डाव असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर म्हणाले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळेच उद्धव ठाकरेंपर्यंत पोहचण्यास अडथळे येते होते, असं देखील केसरकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचं पत्र शिवसेनेने राज्यपालांना दिलं आहे, यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता केसरकर म्हणाले की, “लहानपणी क्रिकेट खेळताना ज्याचा बॅट, बॉल असतो तो आऊट झाल्यावर सगळं घेऊन घरी जातो. याला आम्ही रडीचा डाव म्हणायचो. हा रडीचा खेळ राजकारणात असता कामा नये. राजकारण सर्वसामान्यांसाठी असून ते त्यांच्यासाठीच केलं पाहिजे. त्यामुळे शिवसैनिकांनी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यापासून दूर रहायला पाहीजे”. उद्धव ठाकरेंना चुकीच्या नेत्यांचं मार्गदर्शन होत असल्याने अशी पावलं उचलली जात असावीत असा आरोप केसरकर यांनी केला.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या हाकेनंतर शिवसैनिक आक्रमक

भाजप नेते किरीट सोमय्या (Sirit Somaiya) हे सीए आहेत. ते ज्यावेळी बोलतात त्यावेळी लोकं त्यांना गंभीरपणाने घेतात. कारण त्यांचं या क्षेत्रामध्ये ज्ञान प्रचंड आहे. त्यांचा या ज्ञानाचा वापर जर महाराष्ट्राला झाला तर महाराष्ट्राची आर्थिक स्थिती खूप सुधारू शकते. त्यामुळे एक विद्ववान गृहस्थ म्हणून त्यांच्याबद्दल मला एक आदर आहे. परंतु शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करणं हे योग्य नाहीये. त्यामुळे मी सोमय्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोललो आहे, असं केसरकर म्हणाले.

तसेच, शिवसेनेने राष्ट्रपतीपदासाठी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनी आम्ही एका महिला आदिवासी उमेदवाराला पाठिंबा दिला याचा अर्थ भाजपाला नाही असं विधान केलं होतं. यावर बोलताना ते म्हणाले की, “नरेंद्र मोदींनी त्यांना उमेदवारी दिली आहे. आजपर्यंत एकही आदिवसी आणि विशेषकरुन महिला या देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेली नाही”.

Related Stories

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ‘या’ चेहऱ्यांना संधी

Archana Banage

येरवडा कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान दगडफेक

datta jadhav

ऐंशी लाखांच्या खंडणीसाठी गोळीबाराचा बनाव

datta jadhav

साताऱयात फळविक्रेत्यांमध्ये राडा अन् तरुणांचा हैदोस

Patil_p

महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकी डिस्चार्ज

Tousif Mujawar

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक

Kalyani Amanagi