Tarun Bharat

दिपक केसरकरांच्या पत्रकार परिषदेतील १० मुद्दे; जाणून घ्या एका क्लिकवर

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

आम्ही शिवसेना पक्षाचे सदस्य आहोत. उध्दव ठाकरे यापुढेही आमचं एेकतील अशी अपेक्षा आहे. अनेकवेळा पक्षाच्या निर्णयाप्रमाणे काही निर्णय व्हावे लागतात. मविआतून बाहेर पडावं हे आम्ही अनेकवेळा पक्षप्रमुखांना सुचवलं होत. इतके आमदार एकत्र येऊन सांगत आहेत म्हणजे यात काहीतरी तथ्थ आहे. आमच्यावर कोणाचाही दबाव नाही. मुळात एकनाथ शिंदे हा नेता मुख्यमंत्र्यानीचं दिला होता अशी प्रतिक्रिया दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. गुवाहीटीत शिंदे गटाची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेतील महत्वाच्या मुद्दे जाणून घेऊया.

काय म्हणाले दिपक केसरकर

१)दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे.

२)विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाला आम्ही कोर्टात चॅलेंज करणार आहोत.

३)आमच्या गटाचे नेते एकनाथ शिंदे असतील.

४)आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न योग्य नाही.

५)दिपक केसरकर शिंदे गटाचे प्रवक्ते.

६)आम्ही कोणीही पक्ष सोडला नाही.

७). उध्दव ठाकरे यापुढेही आमचं एेकतील अशी अपेक्षा आहे.

८)बाळासाहेबांचाच विचार पुढे घेऊन जाणार आहोत.

९)लोकांना रस्त्यावर उतरवू, अशी चूकीची भाषा केली जात आहे.

१०) आम्ही शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलो आहोत.

आम्ही शिवसेनेचेच सदस्य आहोत. वस्तुस्थिती वेगळी आहे. तुम्ही रस्त्यावर उतरु नका असे आवाहनही त्यांनी शिवसैनिकांना केले आहे.

Related Stories

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण

Abhijeet Shinde

पुढील २४ तासात धोकापातळी गाठण्याची शक्यता,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा- राहुल रेखावार

Abhijeet Khandekar

लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का? एक्स्प्रेसची साधारण तिकीटे अद्याप बंदच

Rahul Gadkar

देशात बलात्काराचं सत्र सुरूच, महिला कॉन्स्टेबलवर तिघांनी बलात्कार करत रेकॉर्ड केला व्हिडिओ

Abhijeet Shinde

गंभीर आजाराने पुतीन यांचा मृत्यू; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

datta jadhav

डॉक्टरांनी दवाखाने सुरु करण्याकरीता गणेश मंडळाचा हातभार

tarunbharat
error: Content is protected !!