Tarun Bharat

शिवसेना-भाजप युतीबाबत केसरकरांचा गौप्यस्फोट ; म्हणाले, राणेंमुळे युती…

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यात काँग्रेस -राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची महाआघाडी स्थापन झाल्यानंतरही युतीबाबत चर्चा सुरू होत्या अशी स्पष्टोक्ती शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली. तसेच, पंतप्रधान मोदींसोबत (PM Narendra Modi) असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तयारी होती, पण नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले, असा गौप्यस्फोट दिपक केसरकरांनी केला आहे. तसेच सुशांत सिंग राजपूत प्रकरणात राणे पिता-पुत्रांनी दित्य ठाकरेंची बदनामी केली, असेही केसरकरांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनेचे (Shivsena) भाजपसोबत (BJP) संबंध का तुटले, याबाबत गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदींसोबत (PM Narendra Modi) असलेले संबंध जपण्यास तयार होते, पण नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले, असा गौप्यस्फोट दिपक केसरकरांनी केला आहे. आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) बदनामी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करायचं ठरवलं होतं, असंही केसरकरांनी सांगितलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर आमदार कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न करत होते. पण राणेंमुळे युती झाली नाही, असा आरोप केसरकरांनी केला आहे.

ही युती न होण्याचं कारण त्यांनी राणे कुटुंबीयांवर (Narayan Rane Family) ठेवलं आहे. राणे कुटुंबीयांनी सुशांत सिंग आत्महत्या (Sushant Singh Suicide Case) प्रकरणात आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) बदनामी केल्याने उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे ही युती पुढे होऊ शकली नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.

हे ही वाचा : राज्यपालांचा इतिहास कच्चा; रोहित पवारांचा निशाणा

राणेंकडून आदित्य ठाकरेंची बदनामी
शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी म्हटलं की, ‘नारायण राणे (Narayan Rane) यांनी सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप केला. राणे पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्यात मोठा वाटा होता. भाजपचं व्यासपीठ वापरून राणे पिता-पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात नारायणे राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आदित्य ठाकरेंची बदनामी केली. याबाबत पंतप्रधान मोदी आणि भाजप यांच्यासोबत संपर्क केला. मी पंतप्रधानांना याबाबत वैयक्तिक संपर्क करण्याचा प्रयत्न केला. यावर पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिली.

पंतप्रधानांच्या मनात बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे घराण्याबाबत प्रेम आणि आदर असल्याचं दिसून आलं. हे प्रकरण पंतप्रधानांपर्यंत पोहोचल्यावर उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांच्यात संवाद सुरु झाला. यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव यांची भेट झाली. ही दोन्ही महान माणसं आहेत. त्यांच्यात काहीही चुकू नये म्हणून आम्ही काळजी घेतली. संवादानंतर त्यांच्यात भेटही घडून आली. त्यांच्या येणाऱ्या निरोपावरून मोदींचं ठाकरे कुटुंबियांवर असलेलं प्रेम दिसत होतं. कुटुंबप्रमुख कसा असावा हे मोदींनी दाखवून दिलं. याच वेळी मला माझ्या पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपायचे आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.’

दिपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात राणेंनी अनेक पत्रकार परिषद घेतल्या. यावेळी भाजप नेत्यांचाही राणेंच्या भूमिकेला आणि आदित्य ठाकरेंच्या बदनामीला विरोध होता. मी नरेंद्र मोदींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून त्यांच्या कानावर ह्या गोष्टी घातल्या. यावर ठाकरे घराण्याबद्दल प्रेम आणि आदर असल्याची प्रतिक्रिया दिली.

हे ही वाचा : गुंतवणुकीच्या आमिषाने व्यावसायिकाची तीन कोटींची फसवणूक

याच काळात आपण भाजपसोबत राहुया असं शिवसेनेतील अनेक नेते सांगत होते. युतीची बोलणी पुन्हा सुरू व्हावी अशी ठाकरेंची इच्छा होती. पण बोलणी पुढे होऊ शकली नाहीत. एकनाथ शिंदे शिवसेनेतील दुसऱ्या क्रमाकांचे नेते होते. त्यांनी ठाकरेंची भेट घेऊन मूळ विचारधारेसोबत राहत भाजपसोबत राहण्याची मागणी करत होते. अनिल देसाई, मिलंद नार्वेकर, यांनाही याबाबत कल्पना दिली होती.

दरम्यान, युतीची चर्चा करण्यासाठी ज्या आमदारांनी पुढाकार घेतला त्यांनी शिंदेंना पाठिंबा दिला आणि भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. हा एका कुटुंबादतील वाद आहे. शिवसेना संपवण्याचा कोणताही घाट नाही, असंही दीपक केसरकर म्हणाले.

Related Stories

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे विधी पंडित पदवीने सन्मानित

Abhijeet Shinde

पिकांचे अवशेष जाळणे हा प्रकार गुन्हेगारीच्या श्रेणीतून मुक्त

datta jadhav

गडहिंग्लजमधील बहीण-भाऊ पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक

prashant_c

सिंधुताईंचा कोल्हापूरशी साडेतीन दशकाचा स्नेह ! : माजी महापौर भिकशेठ पाटील यांनी केले होते सहाय्य

Sumit Tambekar

breaking- धबधब्यातून वाहत जाऊन दरीत पडलेल्या युवकाचा मृत्यू,भुईबावडा घाटातील घटना

Rahul Gadkar
error: Content is protected !!