ओटवणे येथील घटना
अज्ञात दोन व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
ओटवणे / प्रतिनिधी –
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्या कालच्या सावंतवाडी येथील सत्कार सोहळ्याचा ओटवणे रवळनाथ मंदिरनजिक रस्त्यालगत नागरी कृती समितीने लावलेला फलक अज्ञाताने शनिवारी रात्री फाडल्याचे रविवार सकाळी निदर्शनास आले. त्यामुळे परिसरात खळबळ असून या प्रवृत्तीचा ओटवणे दशक्रोशीतून निषेध व्यक्त होत आहे.
दरम्यान या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये अज्ञात दोन व्यक्ती व त्याची गाडी कैद झाल्याचे दिसत असून शनिवारी रात्री अकरा वाजून तीन मिनिटांनी हा प्रकार घडला आहे. याबाबत ओटवणे येथील सामाजिक युवा कार्यकर्ते उमेश गावकर यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे.