Tarun Bharat

हिंदुत्वाच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी लोक बीकेसीवर येतील- मंत्री दीपक केसरकर

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु आहे. आमचा मेळावा हा विचारांचे सोने लुटणारा असेल. बाळासाहेबांचे हिंदूंचे विचार केवळ महाराष्ट्रात एकनाथ शिंदे मांडू शकतात, त्यामुळे हिंदुत्ववाच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी सगळे बिकेसीवर येतीलअसे वक्तव्य कोल्हापूरचे पालकमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी (Deepak Kesarkar)Cabinet Minister for School Education and Marathi Language) केले आहे. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

मंत्री केसरकरांनी शिवसेना (Shivsena)-भाजप (BJP) युतीवरही भाष्य केले. बाळासाहेब ठाकरेनी यांनी भाजप सोबत युती केली होती. ती तोडण्याचा अधिकार कोणाला नाही. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत.

बाळासाहेबांचे सेवक असणारे चंपासिंह थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर बोलताना केसरकर म्हणाले, चंपासिंह थापा ने शिंदे गटात प्रवेश केला आहे. थापा सारखा व्यक्ती शिंदेंसोबत येत असेल तर त्याला कोणी विकत घेतले असेल का? याचा विचार करा.

अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना केसरकर यांनी, आमच्या कोणत्या आमदाराला मस्ती आलेली नाही. काही जणांनी भाषा चुकीची वापरली मात्र लगेच माफी सुद्धा मागितली आहे. तसेच स्वतः दोषी असलेले काहीजण पैशाची ऑफर दिली म्हणत आहेत. हे केवळ कारवाई टाळण्याचे प्रकार आहेत. त्यामुळे उद्या अटक झाली तर ती राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली असे म्हणतील, अशी टीकाही त्यांनी केली.

शिंदे गटाचा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून मेळाव्याला येणाऱ्या नागरिकांच्या वाहनाच्या पार्किंगची सोयही करण्यात आली आहे. यासाठी दहा मैदाने बुक केली आहे. यामध्ये मुंबई विद्यापीठचे मैदानाही भाड्याने घेण्याचा प्रस्ताव दिलाया आहे. याला राष्ट्रवादीकडून विरोध करण्यात आला आहे. यावर बोलताना केसरकर म्हणाले, मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय आणि ट्राफिक समस्येचा विचार करून विद्यापीठाची जागा घेतली आहे, उद्या ट्राफिक समस्या निर्माण झाली तर दोन्ही बाजूनी हेच आरोप करतील, असेही ते म्हणाले.

हॅलो ऐवजी’ वंदे मातरम म्हणा, असा जीआर सरकारने काढला आहे. सगळ्यांनी वंदे मातरम म्हंटलेच पाहिजे अशी सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत काही मतांतरे आहेत मात्र आम्ही त्यांची समजूत काढू, असे केसरकर म्हणाले.

दुकानांवर मराठी पाट्या लावण्याची सक्ती करण्यात आली आहे. लाव्ल्यानाहीतर कारवाई करण्याचा इशाराही सरकारने दिला आहे. पण अजूनही काही दुकानांवर मराठी पाट्या नाहीत. मराठी पाट्या ह्या लावल्याच पाहिजेत. दुकानदारांशी बोलून मराठी पाट्या पुन्हा प्रसंगी मुदतवाढ देऊ. तसेच मराठी पाट्या सोबत मराठी भाषा ही सर्वांनी बोलायला हवीया बाबत सक्ती नाही मात्र आग्रह आहे, असे ते म्हणाले.

Related Stories

अमेरिकेतील साऊथ डकोटामध्ये ‘या’मुळे वाढला कोरोनाचा धोका

prashant_c

यड्रावमध्ये दोन ट्रकची समोरासमोर धडक

Archana Banage

शिवसेनेकडून ऑफर आल्यास विचार करू

Archana Banage

एफआरपीच्या तुकड्यांवर शेतकऱ्यांच्या बनावट सह्या – राजू शेट्टी

Archana Banage

एकाचवेळी विद्यार्थ्यांनी लॉगईन केल्याने मॉकटेस्टमध्ये गोंधळ

Abhijeet Khandekar

‘या’ लसीपासून अर्धांगवायूचा धोका!

datta jadhav