Tarun Bharat

अनगोळ चव्हाटा देवळात दीपोत्सव उत्साहात

बेळगाव : सोमवारी सायंकाळी रघुनाथ पेठ, अनगोळ येथील चव्हाटा देवस्थानात गल्लीतील युवक, महिला व नागरिकांच्यावतीने दीपोत्सव व भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंदिर परिसरात रांगोळी, दिव्यांची सुंदर आरास करण्यात आली होती. सायंकाळी भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली. 

 भाविकांच्या हस्ते शेकडो दिवे लावून प्रसादाचे वाटप करण्यात आले. गावातील स्थानिक कलाकार यांच्यावतीने सुमधूर भक्तिगीतांचा कार्यक्रम करण्यात आला. यावेळी रघुनाथ पेठ येथील नागरिक व भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Related Stories

फुलेवाडी भविष्यात टेराकोटा कलाकारांचे गाव ठरेल!

Amit Kulkarni

अमननगर-संगमेश्वरनगर निर्बंधित प्रदेश घोषित

Patil_p

सेंट जोसेफ, सेंट पॉल्स, संत मीरा, इस्लामिया संघांची विजयी सलामी

Amit Kulkarni

जोतिबा मंदिरात काळभैरव जन्मोत्सव

Patil_p

बसस्थानक आवारातील रस्त्यांची दुर्दशा

Amit Kulkarni

मुतगा येथे मटकाबुकींवर धाड; 11 जणांना अटक

Patil_p