Tarun Bharat

भारतीय महिला टेटे संघाचा पराभव

Advertisements

चेंगडू (चीन)/ वृत्तसंस्था

2022 विश्व सांघिक पुरुष आणि महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय महिला टेबल टेनिस संघाला जर्मनीकडून पराभव पत्करावा लागला. जर्मनीने या लढतीत भारताचा 3-2 असा पराभव केला. पुरुष विभागात भारताने उझ्बेकवर 3-0 असा एकतर्फी विजय मिळवून आपल्या मोहिमेला प्रारंभ केला.

महिलांच्या विभागातील पहिल्या सामन्यात जर्मनीच्या हेन यांगने भारताच्या मनिका बात्राचा 11-3, 11-1, 11-2 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत आपल्या संघाचे खाते उघडले. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात भारताच्या श्रीजा अकुलाने जर्मनीच्या निना मिटेलहॅमवर 11-9, 12-10, 11-7 अशी मात करत आपल्या संघाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. तिसऱया सामन्यात भारताच्या दिया पराग चितळेने जर्मनीच्या सॅबेनी विंटरवर 3-1 अशा गेम्समध्ये विजय मिळवित भारताला या लढतीत 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चौथ्या सामन्यात जर्मनीच्या निना मिटेलहॅमने भारताच्या मनिका बात्राचा 3-1 अशा गेम्समध्ये पराभव करत आपल्या संघाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. शेवटच्या निर्णायक सामन्यात जर्मनीच्या हेन यांगने भारताच्या श्रीजा अकुलाचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. त्यामुळे जर्मनीने पहिल्या फेरीची ही लढत 3-2 अशा फरकाने जिंकली.

पुरुषांच्या विभागात भारताने गट-2 मधील पहिल्या सामन्यात उझ्बेकचा 3-0 असा पराभव करत विजयी सलामी दिली. पहिल्या सामन्यात भारताच्या हरमित देसाईने उझ्बेकच्या खोलीकोव्हचा 3-0 अशा गेम्समध्ये, दुसऱया सामन्यात भारताच्या राष्ट्रकूल स्पर्धेतील पदक विजेत्या जी. साथियाने उझ्बेकच्या अब्दुल अझिजचा 3-0 अशा फरकाने तसेच तिसऱया सामन्यात भारताच्या मानव ठक्करने उझ्बेकच्या शोकरूखचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. त्यामुळे भारताने ही लढत 3-0 अशी जिंकून उझ्बेकचे आव्हान संपुष्टात आणले.

Related Stories

राजस्थान रॉयल्स आणखी एका विजयासाठी सज्ज

Amit Kulkarni

बलाढय़ मुंबईला रोखण्याचे राजस्थानसमोर आव्हान

Patil_p

चेन्नाई सुपरस्टार उपांत्य फेरीत

Patil_p

ब्राझील-अमेरिका लढत बरोबरीत

Patil_p

पाकच्या शदाब खानला दुखापत

Patil_p

आयपीएलच्या धर्तीवर रंगणार कुस्ती दंगल !

Archana Banage
error: Content is protected !!