वृत्तसंस्था/ ऍडलेड
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सोमवारपासून सुरु झालेल्या 500 दर्जाच्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय ऍडलेड टेनिस स्पर्धेत झेक प्रजासत्ताकच्या लिंडा नोस्कोव्हाने आठव्या मानांकित कॅसेटकीनाचा पहिल्याच फेरीत पराभव करुन विजयी सलामी दिली.
पहिल्या फेरीतील या सामन्यात नोस्कोव्हाने 18 वर्षीय आणि आठव्या मानांकित कॅसेटकीनाचा 6-3, 6-7 (2-7), 6-3 असा पराभव केला. या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात व्हेरोनिका कुडेरमेटोव्हाने अमेरिकेच्या ऍनिसीमोव्हावर 6-3, 6-0 अशी मात करत विजयी सलामी दिली आहे.