वृत्तसंस्था/ पुणे
बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सोमवारपासून सुरु झालेल्या टाटा पुरस्कृत खुल्या महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविणारा भारताचा 15 वर्षीय मानस धामणेचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
एटीपी 250 दर्जाच्या या स्पर्धेतील सोमवारी खेळविण्यात आलेल्या एकेरीच्या पहिल्या सामन्यात अमेरिकेच्या मिचेल मिमोहने मानसचा 6-2, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत विजयी सलामी दिली.