प्रतिनिधी /वास्को
संरक्षण मंत्रालयाचे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी सोमवारी गोवा शिपयार्डला भेट दिली. या भेटीत संरक्षण सचिवांच्याहस्ते नवीन सेटअप व्हर्च्युअल रिऍलिटी सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
या भेटी दरम्यान, संरक्षण सचिवांना गोवा शिपयार्डचे मुख्य व्यवस्थापिक संचालक बी के उपाध्याय यांनी भारतीय नौदल व भारतीय तटरक्षक दलासाठीची जहाज बांधणी तसेच गोवा शिपयार्डच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. यावेळी संरक्षण सचिवांनी गोवा शिपयार्डच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी संवाद साधला. यावेळी त्यांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांबद्धल माहिती देण्यात आली.