प्रतिनिधी /बेळगाव
पदवी, पदव्युत्तर, नर्सिंग कोर्स आणि इतर व्यावसायिक शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांच्या बसपास नूतनीकरणाच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. येत्या 7 जुलैपर्यंत नूतनीकरणाची मुदत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
जुन्या बसपासची मुदत 30 जून रोजी संपली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी 3 जुलैपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र या काळात बसपास वितरणाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुन्हा एकदा पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या बसपास नूतनीकरणाच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत विद्यार्थ्यांना जुन्या बसपासचे नूतनीकरण करून घेता येणार आहे.
परिवहनकडून विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बसपास उपलब्ध करून दिले जातात. दरवषी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला की बसप्रक्रियेला प्रारंभ होतो. कोरोनामुळे दोन वर्षात बसप्रक्रिया विस्कळीत झाली होती. मात्र यंदा शैक्षणिक वर्षाबरोबर बसप्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्राथमिक, माध्यमिक विद्यार्थ्यांना बसपास उपलब्ध करून दिले जात आहे. मात्र पदवी आणि पदव्युत्तर, इतर कोर्सेसचा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसपासची मुदत वाढवून दिली जात आहे.
बी.ए. एम.ए., बी.कॉम. बीएस्सी आणि इतर काही विद्यार्थ्यांच्या परीक्षा अद्याप झाल्या नाहीत. त्यांच्यासाठी बसपास आवश्यक आहे. दरम्यान गैरसोय टाळण्यासाठी विद्यार्थ्यांच्या बसपासचे नूतनीकरण करून दिले जात आहे. मध्यवर्ती बसस्थानकातील बसपास विभागात ही बसपास प्रकिया सुरू आहे. विद्यार्थ्यांनी गुरुवारपर्यंत बसपासचे नूतनीकरण करून घ्यावे.
बसपाससाठी विद्यार्थ्यांना आवाहन
पदवी आणि इतर विद्यार्थ्यांच्या सोयीखातर जुन्या बसपासचे नूतनीकरण करून दिले जात आहे. यासाठी बसपास विभागात व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय इतर विद्यार्थ्यांची ऑनलाईन बसपास प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांनी बसपास काढून घ्यावे.
– ए. वाय. शिरगुप्पीकर(डेपो मॅनेजर बसपास विभाग)