Tarun Bharat

स्पाइसजेटच्या विमानाला आग लागल्याने पाटणा विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

बिहारची राजधानी पाटणा येथे स्पाइसजेटच्या विमानाचे विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग (Patna Airport Emergency Landing) करण्यात आले. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आग लागली. यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमानाचे लँडिंग केल्याने मोठा अपघात टळला आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, फ्लाइटच्या टेक-ऑफनंतर, इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली, त्यानंतर विमानाचे विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. यामुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या विमानात १८५ प्रवासी होते, सर्व सुरक्षित आहेत. वैमानिकाच्या सावधगिरीपणामुळे मोठी दुर्घटना टळली. विमानतळ अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या फ्लाइटचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्याचे पाटणा विमानतळावर लँडिंग करण्यात आले.

विमानाचे इमर्जन्सी लँडिंग का केले?
पाटणाचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लो यांनी सांगितले की, स्पाइसजेटचे विमान दिल्लीला जात होते. उड्डाण करताना, विमानतळ प्राधिकरणाच्या लक्षात आले की त्याच्या विमाना आग लागली आहे. त्यामुळे विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. इतर प्रोटोकॉल पाळले जात आहेत. त्याचवेळी पक्ष्याच्या धडकेमुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याचे डीजीसीएने सांगितले.

Related Stories

कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

datta jadhav

‘रेमडेसिवीर’च्या निर्यातीवर बंदी

Patil_p

आता आयोद्धेत उभारणार ‘महाराष्ट्र सदन’; पर्यावरण मंत्र्यांची मोठी घोषण

Abhijeet Khandekar

उद्योगपती गौतम अदानी आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर तासभर खलबतं

Abhijeet Shinde

भंडाऱ्यात नवजात शिशू केअर युनिटमध्ये आग, 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू

Rohan_P

रजनीकांतची राजकारणात एन्ट्री, 31 डिसेंबरला करणार मोठी घोषणा

Rohan_P
error: Content is protected !!