शेफाली शाहची दमदार भूमिका
नेटफ्लिक्सची बहुप्रतीक्षित सीरिज ‘दिल्ली क्राइम सीझन 2’चा ट्रेलर निर्मात्यांनी सोमवारी जारी केला आहे. ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा शेफाली शाह ही पोलीस उपायुक्त वर्तिका सिंह या भूमिकेत दिसून येत आहे. याचबरोबर नीति सिंह, रसिका दुग्गल, भूपेंद्र सिंह, राजेश तैलंग यांच्यासोबत आदिल हुसैन, अनुराग अरोरा आणि गोपाल दत्त हे कलाकार जुनी व्यक्तिरेखा साकारताना दिसून येणार आहेत.
तनुज चोप्रा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेली ही सीरिज नेटफ्लिक्सवर 26 ऑगस्टपासून स्ट्रीम होणार आहे. ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढविली आहे. दिल्ली पोलीस यावेळी एका सीरियल किलरच्या शोधात असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. हा सीरियल किलर चड्डी-बनियान परिधान करून वृद्धांना लक्ष्य करत असतो.
शेफालीने स्वतःच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘दिल्ली क्राइम सीझन 2’चा ट्रेलर शेअर केला आहे. ‘ एक क्रूर टोळी, दहशतीत शहर, डीसीपी वर्तिका अन् त्यांची टीम येणाऱया अराजकतेला तोंड देण्यासाठी तयार आहे का’ असे तिने कॅप्शनमध्ये नमूद पेले आहे. दिल्ली क्राइमचा पहिला सीझन रिची मेहता यांच्याकडून दिग्दर्शित करण्यात आला होता.