Tarun Bharat

श्रद्धाची हत्या केल्याचा पश्चाताप नाही; आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे

ऑनलाईन टीम/तरुण भारत

संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात (shraddha walker murder case)आता दिवसेंदिवस नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत. श्रद्धाचा खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे करणाऱ्या आफताबची (aftab poonawalla) पॉलिग्राफी चाचणी (poligrafh test) करण्यात आली आहे. यावेळी आफताब ने खून करण्यासाठीच श्रद्धाला मुंबईतून दिल्लीला (Delhi) आणलं होतं असाही खुलासा आफताबने पॉलीग्राफी चाचणीत केला आहे. श्रद्धाची हत्या केल्याचा पश्चात्ताप नसल्याचं आफताबने म्हटलं आहे.

श्रद्धा वालकरचा खून करणाऱ्या आफताबची पॉलिग्राफी चाचणी करण्यात आली. यावेळी आफताबने श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आपण आधीपासूनच श्रद्धाच्या खूनाचा कट रचल्याची माहिती आफताबने दिली आहे. आफताबने दिलेल्या या कबुलीमुळे तपासाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण याआधी दिलेल्या कबुलीमध्ये आफताबने भांडण झाल्यामुळे नशेत श्रद्धाचा खून केल्याचा दावा केला होता.

दरम्यान, आरोपी आफताबनं ज्या हतोड्यानं आणि करवतीनं श्रद्धाची हत्या करत विल्हेवाट लावली, ती सर्व हत्यारं आता दिल्ली पोलिसांना सापडली आहेत. याशिवाय पोलिसांना दिल्लीतील जंगलांमध्ये आणि आफताबच्या किचनमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले असल्याचीही माहिती आता समोर आली आहे. परंतु आता दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केली असून त्यात त्यानं धक्कादायक वक्तव्य केलं आहे.

हे हा वाचा : प्रतापगडावर जाणं हे मुख्यमंत्री शिंदेंचं ढोंग ; संजय राऊतांच टीकास्त्र

दिल्ली पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार, आरोपी आफताबची पॉलिग्राफ टेस्ट केली. त्यात त्यानं श्रद्धाची निर्घृणपणे हत्या केल्याची पुन्हा कबुली दिली आहे. याशिवाय श्रद्धा वालकरच्या हत्येबाबत कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगितलं. पोलिसांना त्याचं हे वक्तव्य ऐकून आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी उद्या म्हणजेच एक डिसेंबरला आफताबची नार्को टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं आता या प्रकरणातील आणखी काही सत्य समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आरोपी आफताबची ही पाचवी आणि शेवटची पॉलिग्राफ टेस्ट असून त्याचा रिपोर्ट तयार केला जाणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याशिवाय आता आरोपीची पॉलिग्राफ टेस्ट पूर्ण झाल्यानंतर आता नार्को टेस्ट करण्याचीही परवानगी कोर्टानं दिल्यानं या प्रकरणात पोलिसांच्या तपासाला धार येणार आहे.

Related Stories

भारतात कोरोना लसीकरणासाठी 82 लाख केंद्रे

datta jadhav

क्रेन कोसळून 11 ठार

Patil_p

मुख्यमंत्र्यांचं फडणविसांच्यावर लयचं प्रेम राव, म्हणाले देशाचे पंतप्रधान देवेंद्र फडणवीस आणि……

Rahul Gadkar

दुर्घटनांचा धोका होणार कमी

Patil_p

“राज्यपालांविरोधात कोर्टात जावं लागणं हे आमच्या घटनेचं दुर्दैवं”

Archana Banage

26 एप्रिलपासून सीबीएसई 10वी, 12वी टर्म-2 परीक्षा

Patil_p