Tarun Bharat

दिल्ली-पॅरिस विमान बिघाडामुळे माघारी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

दिल्लीहून पॅरिसला जाणाऱया एअर इंडियाच्या ‘एआय-143’ या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्याला तातडीने माघारी बोलविण्यात आले. सदोष फ्लॅपमुळे त्याचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. याप्रसंगी विमानात 210 प्रवासी होते. दुपारी 1.30 वाजता उड्डाण केलेले विमान दुपारी 2.25 वाजता पुन्हा दिल्ली विमानतळावर परत आले.

विमानात फ्लॅपची समस्या निर्माण झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. फ्लॅप्स हा विमानाचा एक महत्त्वाचा भाग असून त्याद्वारे लँडिंग एअरस्पीड नियंत्रित केला जातो. यामध्ये तांत्रिक बिघाड असल्यास लँडिंग एअरस्पीड अधिक होते. फ्लॅप कशामुळे निकामी झाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी तांत्रिक तज्ञांकडून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे.

Related Stories

पंतप्रधानांच्या उपस्थितीत प्रमोद सावंत घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

Abhijeet Khandekar

पंतप्रधानांनी काल ‘हेडलाईन आणि कोरे पान’ दिले : पी चिदंबरम

Tousif Mujawar

राज्यपालांना धबधबा सुंदर दिसण्यासाठी अधिकाऱ्याने सोडले धरणातून पाणी

Abhijeet Khandekar

अद्याप हायकमांडकडून कोणताच संदेश आलेला नाही

Patil_p

नेपाळमधील दुर्घटनाग्रस्त विमानाचा सहा तासानंतर लागला शोध

Archana Banage

संसदेचे श्रेष्ठत्व वादातीतच उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे प्रतिपादन

Patil_p