प्रत्येकाच्या सकाळची सुरुवात ही नाश्त्याने होत असते. नाश्ता हा पोटभर चविष्ट असण्याबरोबर पौष्टिक ही असायला हवा. पण डायट वर असणाऱ्या लोकांचा
नाश्ता हा ओट्स च पाहायला मिळतो.पण ओट्सची चव घरातील इतर लोकांना आवडत नसेल तर वेगवेगळा नाश्ता बनवायला लागतो. पण आज आपण ओट्स ची अशी खास रेसिपीने जाणून घेणार आहोत जी कुटुंबातील मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वाना आवडेल. चला जाणून घेऊया मसाला ओट्स बनवण्याची रेसिपी…
साहित्य
एक वाटी ओट्स
दोन चमचे मटार
एक छोटा टोमॅटो
एक छोटा कांदा
एक चमचा तूप
हिरवी मिरची- १
जिरे,
गरम मसाला -१ चमचा
लाल तिखट,
हळद,
आले पेस्ट,
लसूण पेस्ट,
मीठ,
पाणी
कृती
सर्वप्रथम गॅसवर तवा गरम करून त्यात ओट्स टाकून मंद आचेवर भाजून घ्या.एका प्लेटमध्ये ओट्स काढा आणि कढईत तूप गरम करा. तूप गरम झाल्यावर जिरे घालून तडतडून द्या.त्यामध्ये कांदा घाला आणि सोनेरी होईपर्यंत परता. कांदे सोनेरी झाल्यावर आले पेस्ट आणि लसूण पेस्ट घाला. लक्षात ठेवा गॅसची आच कमी असावी.कढईत बारीक चिरलेल्या भाज्या घाला, गाजर, वाटाणे, टोमॅटो, हिरव्या मिरच्या घालून पाच ते दहा मिनिटे शिजवा. हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ एकत्र मिक्स करा.भाजलेले ओट्स आणि पाणी घालून ढवळावे. झाकण ठेवून चार ते पाच मिनिटे तळून घ्या.ओट्स शिजल्यावर आणि पाणी कमी झाल्यावर लागल्यावर गॅस बंद करा.तयार झालेले गरमागरम स्वादिष्ट मसाला ओट्स सर्व्ह करा.


previous post