बेळगाव : इंदिरानगर-अनगोळ येथील गटारी तुंबल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचून अनेकांच्या घरात पाणी शिरत आहे. तेंव्हा महानगरपालिकेने तातडीने या परिसरातील गटारी साफ कराव्यात, अशी मागणी या परिसरातील रहिवाशांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या वळीव पावसामुळे या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झाले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. बऱ्याच दिवसांपासून गटारीच साफ करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पाणी निचरा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. गटारींमध्ये कचरा साचून आहे. याबाबत महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गटारी साफ करण्यासाठी सूचना करण्यात आल्या. मात्र केवळ आश्वासना व्यक्तिरिक्त काहीच करण्यात आले नाही. तेंव्हा पावसाळ्यापूर्वी गटारी साफ कराव्यात, अशी मागणी होत आहे.
Previous Articleबीबीए-बीसीए पदवी अभ्यासक्रमासाठी वेगवेगळा अभ्यासक्रम असावा
Next Article भेंडी बाजार परिसरातील गटारी साफ करण्यास प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.