मार्गशीर्षला प्रारंभ महिलावर्गांकडून पूजा साहित्याची खरेदी
प्रतिनिधी / बेळगाव
मार्गशीर्ष महिन्याला प्रारंभ झाल्याने बाजारात फळा-फुलांना मागणी वाढली आहे. मार्गशिर्षातील पहिल्या गुऊवारी महिलावर्गांकडून पाच फळे, हार, फुलांना मागणी आहे. मार्गशिर्षातील प्रत्येक गुऊवारी महिलांकडून व्रत केले जाते. त्यामुळे बुधवारी आणि गुऊवारी फळांना विशेष मागणी राहणार आहे.
पूजेसाठी फळांना मागणी वाढू लागली आहे. बाजारात चिकू 100 ऊ. किलो, सफरचंद 80 ते 140 ऊ. किलो, संत्री 60 ते 120 ऊ. किलो, डाळिंब 120 ते 180 ऊ. किलो, पेरू 80 ते 100 ऊ. किलो, पपई 50 ऊपयांना एक, पेअर 200 ते 280 ऊ. किलो, इलायची केळी 70 ऊ. किलो, जवारी केळी 50 ते 60 ऊ. डझन असा फळांचा दर आहे.
पुष्पहार, फुले व आंबोतीला मागणी वाढत आहे. 20 ऊपये लहान हार व सुट्या फुलांची विक्री केली जात आहे. मार्गशीर्षमधील पूजेसाठी झेंडूंच्या फुलांचीही आवक वाढली आहे.
मांसाहाराकडे पाठ
मार्गशीर्षला प्रारंभ झाल्याने विशेषत: महिलावर्गांकडून मांसाहार वर्ज्य केला जातो. त्यामुळे महिनाभर मटण, चिकन आणि माशांची मागणी कमी होणार आहे. पुऊषवर्ग बाहेर मांसाहारावर ताव मारत असले तरी घरी मांसाहार बनविणाऱ्या कुटुंबीयांची संख्या कमी असते. त्यामुळे मार्गशीर्षमध्ये मांसाहारची मागणी थंडावलेली पाहायला मिळते.