वार्ताहर /रामनगर
पश्चिम घाटातील गोवा व कर्नाटकाच्या सीमेवर असणारा जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा आता वाहू लागल्याने सदर धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अधिकृतरीत्या परवानगी नाही. तरीही पर्यटक चोरटय़ा मार्गाने जातच आहेत. दूधसागर स्थानकापाशी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांना चुकवून पर्यटक सदर धबधबा पाहण्याचा आनंद घेतात.
जसजसा धबधब्याचा प्रवाह वाढेल तसतसे पर्यटकांना मोह आवरू शकत नाही. यामुळे धबधब्याच्या ठिकाणी प्रतिवषी जातातच. त्यामुळे सदर धबधबा पाहण्यासाठी अधिकृतरीत्या रेल्वे विभागाने परवानगी दिल्यास रेल्वे विभागाच्या उत्पन्नातही भर पडू शकते. स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होऊ शकत असल्याने लवकरच अधिकृतरीत्या परवानगी देण्याची मागणी करण्यात येत आहे.
काही वर्षांपूर्वी सुरेश अंगडी रेल्वेमंत्री असताना बेळगाव येथून वास्को येथे खास करून दूधसागर पाहण्यासाठी चार डब्यांची टेन सुरू करण्यात आली होती. सदर टेन दूधसागर धबधब्याजवळच थांबविण्यात येत होती. या टेनमधून मोठय़ा प्रमाणात प्रवासीवर्गही दूधसागर धबधबा पाहण्यासाठी येत होते. बेळगाव येथून वास्कोला जाणाऱयांना सदर टेनचा चांगलाच फायदा होत होता. परंतु सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर सदर टेन व दूधसागर पाहण्याची परवानगी रद्द करण्यात आली. पूर्वी बंद करण्यात आलेली टेन पुन्हा सुरू केल्यास सर्व पर्यटकांना दूधसागरचा आनंद घेता येईल. पर्यटकांना दूधसागर धबधब्याचा मोह आवरता येत नसल्याने रविवारी बऱयाच पर्यटकांनी आनंद घेतला. सदर दूधसागर धबधबा पाहण्यासाठी फक्त रेल्वे कर्मचारी व त्यांचे कुटुंब तसेच अधिकारी वर्गांनाच अधिकार आहे का? असाही सवाल सर्वसामान्य पर्यटकांकडून करण्यात येत आहे.