Tarun Bharat

नीट पीजी परीक्षा २०२२ पुढे ढकलण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

 नीट पीजी परीक्षा २०२२ (​NEET PG Exam२०२२) पुढे ढकलण्याची मागणी देशभरातील विद्यार्थ्यांनी केली आहे. यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोविड ड्युटीमुळे यावर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीला वेळ मिळालेला नाही. त्यामुळे २१ मे रोजी होणारी परीक्षा किमान दहा आठवडे पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यावर आज (१३ मे) सर्वोच्च न्यायालयात (supreme court) सुनावणी असून ही परीक्षा पुढे ढकलणार का? याकडे देशभरातील हजारो विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.

याआधी भारतीय वैद्यकीय संघटनेने (IMA) गुरुवारी (१२ मे) केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांना पत्र लिहून परीक्षेची तारीख पुढे ढकलण्याबाबत विचार करण्यास सांगितलं आहे. या पत्रात म्हटलं आहे की, “राज्यांमधील रिक्त पदांसाठीचे समुपदेशनाची प्रक्रिया मे महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कोरोना महामारीच्या काळात कोरोना योद्धा म्हणून पाच ते दहा हजार विद्यार्थांनी इंटर्न म्हणून काम केलं. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पूर्ण होण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी NEET PG परीक्षेला बसता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेऊन NEET PG परीक्षा काही दिवस पुढे ढकलण्यात यावी.”

दरम्यान देशभरता नीट पीजी परीक्षा २१ मे रोजी होणार आहे. मागील काही दिवसांपासून NEET PG 2021 काऊंसलिंगच्या प्रक्रियेला उशीर होत असल्याने अनेक विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची किंवा स्थगित करण्याची मागणी करण्यात येत आहे. कोरोना महामारीमुळे नीट पीजी 2021 परीक्षेनंतर प्रवेशासाठीचे काऊंसलिंगचे राऊंड अद्याप अनेक राज्यात पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे काऊंसलिंग राऊंड्स आणि यावर्षी होणारी नीट पीजी परीक्षा यात फार अंतर नाही. शिवाय कोविड ड्युटीमुळे यावर्षी विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीला पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे किमान दहा आठवडे परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं याकडे सगळ्याच विद्यार्थांचं लक्ष आहे.

Related Stories

रस्त्याअभावी मातेसह नवजात बालकाला मृत्यूने गाटले

Archana Banage

बिहारमध्ये ‘सत्ताबदला’ची चर्चा

Patil_p

कर्नाटक: पहिली ते नववी परीक्षा रद्द

Archana Banage

अमित शहांच्या उपस्थितीत बोडोलँड शांतता करारावर स्वाक्षऱया

prashant_c

प्रक्षोभक भाषण प्रकरणी अकबरुद्दीन ओवैसी, बांदी यांच्यावर गुन्हा

datta jadhav

शेतकरी आंदोलन : हरियाणा सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Tousif Mujawar
error: Content is protected !!