बेळगाव : शिवबसवनगर येथील जेएनएमसीच्या जवळ केपीटीसीएल रोडवर एल अॅण्ड टीने पाण्याची पाईप लाईन घालण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले. परंतु पाईप लाईन घातल्यानंतर रस्ता पूर्ववत न करता केवळ तेथे खडी टाकून खोदकाम बुजविले आहे. यामुळे दररोज या ठिकाणी दोन ते चार लहान-सहान अपघात होत आहे. पाईपलाईनचे काम पूर्ण होवून 15 दिवस झाले तरी अद्याप रस्त्याचे पूर्ण दुरुस्ती केली नाही. पण याचा फटका वाहनचालकांना होत आहे. मोठा अपघात किंवा अनर्थ घडण्यापूर्वीच या रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी होत आहे.
Previous Article‘तो’ धोकादायक खड्डा त्वरित बुजवा
Next Article शहापूर-पवार गल्ली येथील मातीचे ढीग हटविले
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.