Tarun Bharat

जमिनीला योग्य दर देण्याची शेतकऱयांची मागणी

रामदुर्गमधील शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव-कुडची रेल्वेमार्गासाठी रामदुर्ग तालुक्मयातील कमकेरी गावातील शेतकऱयांच्या जमिनी घेण्यात आल्या आहेत. जमिनी घेताना योग्य तो दर दिला जाईल, असे सांगितले होते. मात्र आता तुटपुंजा दर देऊन शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे कमकेरी गावातील शेतकऱयांनी आणि नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन आम्हाला योग्य भाव द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

रेल्वेमार्गासाठी जमिनी घेतल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र अद्याप रक्कम देण्यात आली नाही. बागलकोट जिह्यातील शेतकऱयांना एकरी 19 लाख रुपये दर दिला गेला आहे. तेच रामदुर्ग तालुक्मयातील शेतकऱयांना मात्र 8 लाख 20 हजारप्रमाणे दर देण्यात आला आहे. त्यामुळे रामदुर्ग तालुक्मयातील शेतकऱयांवर अन्याय झाला आहे. तेंव्हा तातडीने आम्हाला इतर जिह्यांप्रमाणेच रक्कम द्यावी, अशी मागणी शेतकऱयांनी केली आहे. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी कृष्णा आरकेरी, विठ्ठल मेटगुड, हणमंतगौडा बिरादार, रमेश मुडमल, सुभाष आरकेरी, तिम्मान्ना उदपुडी, लंचाप्पा आरकेरी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

स्मार्ट रोडवरील गाळय़ाला 33 हजार रुपये सर्वाधिक बोली

Patil_p

दादागिरी करून पैसे उकळणारा पोलीस गजाआड

Omkar B

खादरवाडी धरणात बुडाला पिरनवाडीचा तरुण

Amit Kulkarni

आता विवाह समारंभासाठी 40 जणांची उपस्थिती

Amit Kulkarni

‘शिवचरित्र’ पारायणाला वाढता प्रतिसाद

Patil_p

महापुरापासून वाचविण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची गरज

Amit Kulkarni