बेळगाव : गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. यातच महाद्वार रोड, सहावा क्रॉस येथे ड्रेनेजचे पाणी तुंबून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याबाबत महानगरपालिकेला कळवूनही त्याला कोणताच प्रतिसाद दिला नाही. परिणामी या परिसरात आरोग्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा तातडीने अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. सध्या शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारख्या आजारांनी अनेक जण त्रस्त झाले आहेत. यातच जोरदार पाऊस व ड्रेनेजचे पाणी साचल्यामुळे महाद्वार रोड परिसरात समस्या निर्माण झाली आहे. तेव्हा तातडीने मनपाने ही समस्या सोडवावी, अशी मागणी होत आहे.
Previous Articleसमर्थनगरातील समस्यांची आमदारांकडून पाहणी
Next Article गणाचारी गल्लीतील घर अर्धवट कोसळल्याने धोका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.