वार्ताहर /शिवोली
दांडा, गुडे, शिवोली ते म्हपसा मार्गे बंद असलेली कदंबची बस सेवा पूर्ववत सुरु करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
माजी जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी गुडे तसेच दांडा येथील लोकांची समस्या जाणून घेऊन या मार्गावर कदंब बस सुरु केली होती. कालांतराने 2020 साली कोविडची महामारी सुरु झाली व लोकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध वाढल्याने सदर बस बंद करण्यात आली होती.
ज्यांच्याकडे वाहने नाहीत त्यां गुडे येथून स्टेट बँकेपर्यंत चालत जावे लागते तसेच दांडा येथील लोकांना माजी पंचसदस्य आल्बा फर्नांडीस यांच्या घरापर्यंत जावे लागते. जवळजवळ दीड किलोमीटर पर्यंत चालत प्रवास करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांना चालत जाण्याचा भरभूर ऱहास काढावा लागतो. तसेच या बसचा शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा भरभूर उपयोग होत होता असे व्दारकानाथ फडते यांनी तरुण भारतशी बोलतांना सांगितले.
जुन महिन्यांपासून शाळा सुरु होणार आहेत. सरकारने आमच्या मागणीकडे लक्ष घालून बंद असलेली कदंब बस पूर्ववत सुरु करावी असे श्री. फडते यांनी मांगणी केली.