Tarun Bharat

डेमी लोवाटो पुन्हा रिलेशनशिपमध्ये

Advertisements

गायक-संगीतकाराला करतेय डेट

अमेरिकन रॉकस्टार डेमी लोवाटो एका संगीतकाराला डेट करत आहे. ‘स्किन ऑफ माय टीथ’ची गायिका स्वतःच्या सहकारी संगीतकारासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. डेमी स्वतःचे जुने आयुष्य विसरून आता नव्या नात्यात स्थिरावू पाहतेय. डेमी जगाच्या कानाकोपऱयात चाहते असणारी हॉलिवूडची दिग्गज गायिका आहे.

डेमीच्या या नव्या प्रियकराची ओळख अद्याप उघड झालेली नाही. डेमी लोवाटोसाठी हा योग्य जोडीदार ठरणार असल्याचा केवळ खुलासा करण्यात आला आहे. डेमीचे नाव यापूर्वी गायक आणि अभिनेता मॅक्स एरिच याच्यासोबत जोडले गेले होते.

डेमी आणि मॅक्सने सुमारे 6 महिन्यांपर्यंत परस्परांना साथ दिली होती. त्यानंतर या दोघांनी नात्यातून वेगळे होण्याची घोषणा केली होती. एका नव्या रिलेशनपिशमध्ये असण्यासोबत डेमी देखील स्वतःचा आठवा स्टुडिओ अल्ब्मा होली ‘एफव्हीसीके’ प्रदर्शित करण्याची तयारी करत आहे. तिचे नवे गाणे 19 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी तिने दोन गाणी प्रदर्शित केली आहेत.

Related Stories

डॉक्टर डॉनमध्ये दिसणार सागर कारंडे

Patil_p

अप्पांचा मॉडर्न अवतार

Patil_p

‘भक्षक’मध्ये पत्रकाराच्या व्यक्तिरेखेत भूमी

Patil_p

लवकरच एकत्र झळकणार मलायका अन् अर्जुन

Patil_p

कोरोना योद्धय़ांना कवितेतून सलाम

Patil_p

ऐश्वर्या रजनीकांत अन् धनुष विभक्त

Patil_p
error: Content is protected !!