Tarun Bharat

नोटाबंदीचा निर्णय योग्यच; सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दिलासा

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

मोदी सरकारने 2016 मध्ये घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला. 2016 चा नोटाबंदीचा निर्णय योग्यच होता. त्यामध्ये काहीही त्रुटी आढळत नाहीत. त्यामुळे हा निर्णय आता बदलता येणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिला.

मोदी सरकारने 2016 साली 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आव्हान देणाऱ्या विविध प्रकारच्या 58 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर आज सुनावणी झाली. नोटबंदीचा निर्णय घटनाबाह्य नाही. या निर्णयात कोणत्याही त्रुटी आढळत नाहीत, त्यामुळे तो निर्णय वैध आहे. हा निर्णय आता बदलता येणार नाही. तसेच बंद झालेल्या नोटा चलनात आणण्याचा आरबीआयला अधिकार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय कायम ठेवला.

अधिक वाचा : मेक्सिकोत कारागृहावर अंदाधुंद गोळीबार; 14 ठार

सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीवेळी हा निकाल राखून ठेवला होता. आज सर्व याचिका न्यायालयाने सर्व याचिका फेटाळून लावत मोदी सरकारला दिलासा दिला.

Related Stories

दीपक कोचर यांना 19 पर्यंत इडीची कोठडी

Patil_p

स्वयंघोषित गुरु नित्यानंद विरोधात इंटरपोलकडून नोटीस जारी

prashant_c

“धमकी देऊन न्याय मिळणार नाही, तर हायकोर्टात…”; अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

Archana Banage

अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैन्याची घुसखोरी रोखली

datta jadhav

नोव्हेंबरमध्ये वाहनविक्रीमध्ये 21 टक्के वाढ

Patil_p

‘काशी विश्वनाथ धाम’चे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

Patil_p